जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शादी डॉट कॉम'वरून महिलेला जाळ्यात ओढले, पण VIDEO CALL मुळे झाला भांडाफोड

'शादी डॉट कॉम'वरून महिलेला जाळ्यात ओढले, पण VIDEO CALL मुळे झाला भांडाफोड

सगळ्यांच्या आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी हृदयाच्या जवळ असतात. ती नाती जपण्याचा आयुष्यभर प्रयत्नही केला जातो. नातं टिकवण्याचेही काही नियम असतात. नात्यात अतिप्रामाणिकपणा अनेकदा हिंसाचाराकडे जातो.

सगळ्यांच्या आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी हृदयाच्या जवळ असतात. ती नाती जपण्याचा आयुष्यभर प्रयत्नही केला जातो. नातं टिकवण्याचेही काही नियम असतात. नात्यात अतिप्रामाणिकपणा अनेकदा हिंसाचाराकडे जातो.

‘शादी डॉट कॉम’ या साईटवर अमरावतीतील एका महिलेची मुंबईतल्या एका तरुणासोबत मैत्री झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

संजय शेंडे, अमरावती, 1 फेब्रुवारी : सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या लग्न जुळणाऱ्या संस्थांच्या वेबसाइट उपलब्ध आहे. यापैकीच एक असलेले ‘शादी डॉट कॉम’ या साईटवर अमरावतीतील एका महिलेची मुंबईतल्या एका तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीच्या माध्यमातून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. परंतु समोरच्या व्यक्तीने खोटे प्रोफाईल बनवून आणि कंत्राटदार असल्याचे सांगत एका महिलेला 26 लाखांचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे. अमरावती येथील पती पासून विभक्त झालेल्या महिलेने आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर नोंदणी केली. यादरम्यान तिची मुंबई मधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार असल्याची खोटी माहिती दिली. पण या माहितीवर विश्वास या महिलेने ठेवला. आपल्याला या  व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवणूक झाल्याचे सांगत आरोपीने या महिलेला पैशाची मागणी केली. अजय सिंगने आधी पंधरा ते वीस लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला दोन लाख नंतर वीस लाख नंतर एक लाख नंतर नव्वद हजार आणि शेवटी दोन लाख असे एकूण सव्वीस लाख रुपयांचा चुना या आरोपीने महिलेने लावला. संतापजनक! आईनेच 15 दिवसांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकलं दरम्यान, एक दिवस हे दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पीडित महिलेला एका महिलेचा आवाज आला. ती महिला कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी तिने पुन्हा कॉल केला. महिलेने विचारणा केली असता मित्राची पत्नी आहे, असे खोटे कारण अग्रवालने सांगितले. त्यानंतर अजयसिंह अग्रवाल हा आपली फसवणूक करत असल्याचा संशय पीडित महिला आला. त्यानंतर महिलेने मुबंईला जाऊन अजय अग्रवाल याची विचारपूस केली असता त्याने फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्या महिलेने आरोपी अजयसिंग याच्याविरोधात अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात