उंच जाणाऱ्या झोक्याने मृत्यूपर्यंत नेलं, 13 वर्षाच्या चिमुरडीचा ह्रदयद्रावक अंत

उंच जाणाऱ्या झोक्याने मृत्यूपर्यंत नेलं, 13 वर्षाच्या चिमुरडीचा ह्रदयद्रावक अंत

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील इंदिरा नगर परिसरातील ही घटना घडली आहे.

  • Share this:

जळगाव, 1 फेब्रुवारी : झोका खेळताना दोराचा फास लागून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील इंदिरा नगर परिसरातील ही घटना घडली आहे. राधा लक्ष्मण भिल असं मृत मुलीचं नाव आहे.

झोका खेळता खेळता झोक्याचा दोर गळ्यात आवळला गेल्याने फास लागून 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी शिरसोली इंदिरा नगर येथे घडली. राधा लक्ष्मण भिल हिला जिल्हा शासकीय रूग्णालयात कुटुंबियांनी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले.

इंदिरा नगर येथे राहत्या घरात राधा ही मुलगी झोका खेळत होती. अचानक तिच्या गळ्या भोवती दोर आवळला गेल्याने फास लागला त्यात ती बेशुध्द होवून खाली पडली. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या पूर्वी घडली. शेजारील नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर राधा हिला तत्काळ जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथं आणलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले.

'शादी डॉट कॉम'वरून महिलेला जाळ्यात ओढले, पण VIDEO CALL मुळे झाला भांडाफोड

बालिकेचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. हे कुटुंब मुळचे मेहरुण येथील असून उदरनिर्वाहासाठी शिरसोलीला स्थायिक झाले आहेत. या प्रकरणी एमआडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

First published: February 1, 2020, 11:19 PM IST

ताज्या बातम्या