नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : पाकिस्तानमधून एक अतिशय हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे (Pakistan Shocking News). यात एका गर्भवती महिलेच्या डोक्यात दोन इंच लांब खिळा ठोकण्यात आला (Nail Hammered into Head of Pregnant Woman). सुदैवाने हा खिळा तिच्या डोक्यात खोल शिरला नाही आणि तिचा मृत्यू झाला नाही. Metro च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर एक अजब प्रकरण आलं, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की महिलेच्या डोक्यात खिळा अडकलेला आहे. 49 वर्षांच्या खासदाराचं 18 वर्षांच्या तरुणीसोबत तिसरं लग्न, मुलीला होतोय संताप डॉक्टर हैदर खान यांनी सांगितलं की आधी महिलेनं स्वतः हा खिळा डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिळा न निघाल्याने ती पेशावरच्या उत्तर-पश्चिमी शहरातील एका रुग्णालयात गेली. त्यावेळी ती पूर्णपणे शुद्धीवर होती मात्र अतिशय वेदनेत होती. जेव्हा तिच्या डोक्याचा एक्स-रे केला गेला तेव्हा त्यात दोन इंचाच खिळा दिसला. सुदैवाने हा खिळा डोक्यामध्ये खोलवर शिरला नव्हता, अन्यथा महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. महिलेनं सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की कोणाच्यातरी सल्लावरुन तिने स्वतः आपल्या डोक्यात खिळा ठोकून घेतला. मात्र, नंतर तिने सांगितलं की हे काम दुसऱ्याच व्यक्तीने केलं आहे. पेशावर पोलीस महिलेच्या डोक्यात खिळा ठोकणाऱ्याचा शोध घेत आहेत. पाकिस्तानमध्ये जवळच्या नातेवाईंकामध्ये लग्न करण्याने या आजाराचा वाढला धोका! या महिलेला तीन मुली आहेत आणि चौथ्यांदाही तिच्या गर्भात मुलगीच होती. त्यामुळे ती एका फॅथ हिलरच्या संपर्कात आली, यावेळी त्याने मुलगाच होणार याची खात्री देत महिलेच्या डोक्यात खिळा ठोकला. या खिळ्यामुळे महिलेच्या माथ्याच्या वरच्या भागात खड्डा झाला होता. मात्र, सुदैवाने डोक्यात हा खिळा आतपर्यंत गेला नाही. डॉक्टरांनी सांगितलं की खिळा आतमध्ये घुसवण्यासाठी हातोडीचा किंवा इतर जड वस्तूचा वापर केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







