नागपूर, 8 डिसेंबर : क्राईम कॅपिटल अशा नावाने कुप्रिसद्ध असलेल्या नागपूर शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या एम्प्रेस मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीची हत्या कशी करु शकतो? असा सवाल स्थानिकांच्या मनात उपस्थित होतोय.
स्थानिक नागरिकांना या घटनेची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. संबंधित घटना ही नागपूर शहरातील गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत एक्सप्रेस मॉल परिसरात घडली आहे. स्थानिकांना जेव्हा या घटेनची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने गणेश पेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी देखील तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखत घटनास्थळी भेट दिली. यावेळी घटनास्थळावरची एकंदरीत परिस्थिती बघून पोलिसांना धक्का बसला. एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली होती. तिच्या गळ्यावर काही खुणा दिसत होत्या. त्यातून तिची गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलीस या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा : पत्नीसोबत वाद, संतापलेल्या पित्याचं क्रूर कृत्य, पण सात वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष?
प्रियकराने दुपट्ट्याने गळा आवळून प्रेयसीची हत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास गांधीसागर जवळील एम्प्रेस मॉलमधील चौथ्या माळ्यावर उघडकीस आली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. फरजाना (वय 21, रा. गिट्टीखदान) असे मृतकाचे तर मुजाहिद अन्सारी (वय 22 रा. मोमीनपुरा) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजाना आणि मुजाहिदमध्ये प्रेमसंबंध होते. दोघे लग्नही करणार होते. परंतु काही दिवसांपूर्वीच फरजानाचे अन्य एका युवकासोबत साक्षगंध झाले. त्यामुळे तो संतापला. 2 डिसेंबरला त्याने तिला भेटायला बोलाविले. ती मुजाहिद याला भेटली. त्यानंतर तो तिला घेऊन एम्प्रेस मॉलमध्ये आला. तेथील एका खोलीत दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली व घरी गेला. दरम्यान तिच्या नातेवाइकांनी गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीसाठी मुजाहिद याला याला बोलाविले. फरजानाची हत्या केल्याचे त्याने मान्य केल्यानंतर हत्याकांडाचा उलगडा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.