नागपूर, 21 जानेवारी: नागपूरमधून (Nagpur) आज सकाळीच अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे. नागपूर ग्रामीणच्या खापरखेडा या मुख्य बाजारपेठेत बुधवारी एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अत्यंत निघृणपणे सदर इसमाची हत्या (Murder) करण्यात आली. याठिकाणी असणाऱ्या राजबाबा बियर बार समोर ही घटना घडली आहे. किरकोळ वादातून या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली.
या मृत तरूणाचं नाव प्रशांत घोडेस्वार (Prashant Ghodeswar) असून जागेच्या वादातून त्याला ठार मारण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. या 30 वर्षीय तरुणाची चार ते पाच आरोपींनी हत्या केल्याची माहिती मिळते आहे. याकरता आरोपींकडून धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. जागेच्या वादातून प्रशांतला त्याचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर खापरखेडा परिसरात अत्यंत तणावाचं वातावरण आहे.
(हे वाचा-नवीन कपडे नाही म्हणून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना)
बुधवारी ही घटना घडल्यानंतर सर्व आरोपी फरार आहेत मात्र सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले आहेत. याच आधारावर आरोपींचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. केवळ जागेच्या वादातून ही घटना घडली की त्यामागे आणखी काही प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. नागपूर ग्रामीणमधील खापरखेडा परिसर मात्र या घटनेनंतर चांगलाच हादरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news