Home /News /crime /

हडपसरमधील कालव्यात सापडलेल्या मृतदेहामागचं गुढ उलगडलं; पोलिसांनी दोघांना केलं गजाआड

हडपसरमधील कालव्यात सापडलेल्या मृतदेहामागचं गुढ उलगडलं; पोलिसांनी दोघांना केलं गजाआड

Murder in Pune: पाच दिवसांपूर्वी हडपसर परिसरातील कालव्यात (Hadapsar Canal) एक अज्ञात मृतदेह (Dead body) आढळला होता. या प्रकरणाचा छडा हडपसर पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या (Two accused arrested) ठोकल्या आहेत.

पुढे वाचा ...
    पुणे, 21 मार्च: पाच दिवसांपूर्वी हडपसर परिसरातील कालव्यात (Hadapsar Canal) एक अज्ञात मृतदेह (Dead body) आढळला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांनी या मृत्यूचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या (Two accused arrested) ठोकल्या आहेत. चोरीच्या प्रकरणानंतर पोलिसांत तक्रार करतील या भीतीपोटी आरोपींनी मृत नेने यांच्या डोक्यात दगड घालून हत्या (Theft and murder crime) केली असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पर्वती परिसरातील कालव्यात टाकून दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा छडा पोलिसांनी पाच दिवसांच्या आत लावला असून दोन आरोपींना अटक केली आहे. सिंहगड रस्ता येथील रहिवासी असणाऱ्या सतिश संजय सुतार आणि धायरी फाटा येथील मिलींद पवळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर 46 वर्षीय हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव राहुल श्रीकृष्ण नेने असं आहे. आठ दिवसापूर्वी आरोपींनी नेने यांना बेदम मारहाण करून त्यांची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. तत्पूर्वी त्यांनी सिंहगड रस्ता परिसरात मृत नेने यांना एटीएममधून पैसे काढायला लावलं होतं. त्यानंतर आरोपींनी त्यांची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी मृतदेह पर्वती परिसरातील कालव्यात टाकून घटना स्थळावरून धूम ठोकली होती. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, मृत नेने 13 मार्च रोजी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह हडपसर परिसरातील कालव्यात आढळून आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि घटनेचा तपास केला. त्यानंतर हडपसर पोलिसांनी पाच दिवसांच्या आत संबंधित हत्येचं गुढ उलगडलं आहे. पोलिसांनी सिंहगड रस्तावरील राजाराम पुल, संतोष हॉल आणि दांडेकर पुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून चौकशी केली. त्यानंतर दांडेकर पुलाजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मृत नेने यांना दुचाकीवरून घेऊन जाताना दिसले आहेत. (वाचा -बंद घरावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सराईत भामटा लिंग्याला सापळा रचून अटक) या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धायरी आणि सिंहगड रस्ता येथील रहिवासी असणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून आरोपी लवकरच गुन्ह्याची कबुली देतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder Mystery, Pune, Theft

    पुढील बातम्या