Home /News /crime /

आधी भाड्याने घेतलं दुकानं नंतर पाडलं भगदाड, कोट्यवधीचं सोनं लुटणार तेच...

आधी भाड्याने घेतलं दुकानं नंतर पाडलं भगदाड, कोट्यवधीचं सोनं लुटणार तेच...

बँक आणि दुकानाला सामाईक असलेल्या भिंतीला भगदाड पडायला या दरोडेखोरांनी सुरुवात केली होती.

उल्हासनगर, 27 जून: बँकेवर दरोडा (bank robbery) टाकत असताना 7 दरोडेखोरांना वेगवेगळी हत्यारं आणि साहित्यासह विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police station) ऐनवेळी बेड्या ठोकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, या सातही दरोडेखोरांनी बँकेला लागूनच शेजारी असलेला गाळा भाडेतत्वावर घेतला होता आणि इथे त्यांनी काही दिवस फळ विक्रीचा व्यवसाय केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ४ भागात न्यू शिवम अपार्टमेंटमधील मुथ्यू फायनान्स बँकेवर (Muthoot finance) मध्यरात्री सात दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी त्यांनी फळांचे दुकान आणि बँकेला सामायिक असलेल्या भिंतीला भगदाड पडायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच या सातही दरोडेखोरांनी बँकेला लागून शेजारी असलेला गाळा भाडेतत्वावर घेतला होता. इथे त्यांनी काही दिवस फळ विक्रीचा व्यवसाय केला. हे करत असतांना याच दरम्यान संबंधित बँकेची रेकी करून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी बँकेवर दरोडा टाकायला सुरुवात केली. मात्र गस्तीवर असणारे पोलीस या बँकेच्या जवळून जात असताना त्यांना आवाज आला तसंच इथे काही संशयास्पद हालचाली आढळल्या. ...आणि 15 दिवसांच्या मुलीची हत्या करून विहिरीत फेकलं; तपासात धक्कादायक कारण त्यानंतर यासंबंधाची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली. घटनेचं गांभीर्य ओळखत वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात घटनास्थळी आले आणि त्यांनी दुकानाचे शटर उघडा अन्यथा टाळा तोडू, असे दरोडेखोरांना सांगितले. पोलीस आल्याचे कळताच दरोडेखोरांपैकी एकाने शटर उघडले. यावेळी बँक आणि दुकानाला सामाईक असलेल्या भिंतीला भगदाड पडायला या दरोडेखोरांनी सुरुवात केली होती. पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणाचा पंचनामा करून दरोडेखोरांना ताब्यात घेतले. रामसिंग मानसिंग सिंग, तपन मंडल, कालू शेख, अजीम शेख, जहीर अहमद, इमाम्मुद्दीन खान, रिजाउल शेख या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले गॅस सिलेंडर, गॅस कटर, हातोडा, पिस्टल, तलवार ही सर्व  साहित्य जप्त करण्यात आली आहेत. 1 ऑक्टोबरपासून वाढणार तुमचा खर्च, LPG गॅसच्या किंमतीत होणार मोठी वाढ दरम्यान, हे सर्व दरोडेखोर  झारखंड आणि उत्तर प्रदेश, नेपाळ भागातील आहेत. हे सर्व दरोडेखोर सराईत असून देशाच्या विविध भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.  पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी याआधीच आपल्या पोलीस ठाण्यातील ए.ए.बागबान, एच .व्ही.चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि पोलीस ठाण्यातील इतर सहकाऱ्यांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात काही परराज्यातील काही टोळ्या या बँकेत दरोडा टाकण्यासाठी उद्देशाने बँकांच्या शेजारी दुकान भाड्याने घेत संधी साधून बँकेत दरोडा टाकत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच सुचनेचा अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केलं जातंय.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Crime news, Maharashtra

पुढील बातम्या