• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • ...आणि 15 दिवसांच्या मुलीची हत्या करून विहिरीत फेकलं; पोलिसांच्या तपासात धक्कादायक कारण आलं समोर

...आणि 15 दिवसांच्या मुलीची हत्या करून विहिरीत फेकलं; पोलिसांच्या तपासात धक्कादायक कारण आलं समोर

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

मुलगी ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते असं म्हणतात आणि या घरात तिचीच हत्या करण्यात आली.

 • Share this:
  गुरुदासपूर/पाकिस्तान, 27 जून : पाकिस्तानातील टंडियानवाला येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कोणा तांत्रिकाच्या म्हणण्यावरुन आपल्या 15 दिवसांच्या भाचीची हत्या केली. यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत असताना माणूस अधोगतीकडे जात असल्याची शंका या घटनेतून येते. सीमापार सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टंडियानवाला येथे राहणारे मेहताब खान यांच्या घरात एका मुलीने जन्म घेतला. ( 15 day old girl killed and threw her into a well shocking reason ) मुलीच्या जन्माच्या दोन दिवसांनंतर मेहताबच्या आईचं निधन झालं. या कारणामुळे मेहताबच्या भावाला घरात आलेलं जन्मजात बाळ शूभ नसल्याचं वाटलं. त्याने यासाठी फैसलाबाद येथील एका तांत्रिकाशी संपर्क केला. यावेळी तांत्रिकाने असगरला सांगितलं की, जन्माला आलेली मुलगी कुटुंबासाठी शूभ नाही. जो पर्यंत मुलगी जिवंत राहिलं, कुटुंबावर संकट येत राहतील. हे ही वाचा-धक्कादायक! घरात सुरू होता रक्ताचा काळा बाजार; दारूड्यांचं रक्त घेऊन सप्लाय मात्र 26 जून रोजी मुलगी कुठेच दिसत नसल्यामुळे तिच्या आईने पोलिसात तक्रार केली.  पोलिसांनी परिस्थिती पाहता बेपत्ता बाळाच्या काकाला संशयेच्या आधारावर ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्याने सांगितलं की, मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. पोलिसांना निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या विहिरीतून मुलीचा मृतदेह सापडला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: