मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फुकटात आयफोन पाहिजे म्हणून तरुणाचे डिलिव्हरी बॉयसोबत भयानक कांड, पोलिसांनाही बसला धक्का

फुकटात आयफोन पाहिजे म्हणून तरुणाचे डिलिव्हरी बॉयसोबत भयानक कांड, पोलिसांनाही बसला धक्का

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आयफोन सर्वात महागड्या फोनपैकी एक आहे आणि या फोनची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. मात्र जवळ पैसे नसूनही आयफोन घेण्यासाठी तरुणाने केलेल्या कृत्याचा पर्दाफाश होताच पोलीसही हादरले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    मुंबई, 20  फेब्रुवारी : आयफोन सर्वांत महागड्या फोनपैकी एक आहे आणि या फोनची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आयफोनसाठी किडनीही विकेन अशा अर्थाचा सोशल मीडियामध्ये फिरणारा जोक तर खूपच सामान्य झाला आहे. बऱ्याचदा आयफोनसाठी लोकांनी विचित्र कृत्य केल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आयफोनसाठी एका डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

     पोलिसांनाही बसला धक्का 

    कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील अर्सिकेरे शहरात ही घटना घडली आहे. खून करणाऱ्या आरोपीचं वय 20 वर्षं असून, हत्या झालेल्या व्यक्तीचं वय 23 वर्षं आहे. 11 फेब्रुवारी रोजी, अर्सिकेरे शहरातील अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळ कर्नाटक पोलिसांना एक जळालेला मृतदेह आढळला होता. अशाप्रकारे रेल्वे स्थानकाजवळ जळालेला मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला आणि त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहून अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले. तपासात जे खुलासे झाले त्यामुळे पोलीसही चकित झाले आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्सिकेरे शहरातील लक्ष्मीपुरा लेआऊटमध्ये राहणाऱ्या हेमंत दत्ताने ऑनलाइन आयफोन बुक केला. ई-कार्टचा डिलिव्हरी बॉय हेमंत नाईकला हे बुकिंग पोहोचवण्याची जबाबदारी मिळाली. आयफोनची डिलिव्हरी करण्यासाठी हेमंत नाईक लक्ष्मीपुरा भागातील हेमंत दत्ताच्या घरी पोहोचला. फोन डिलिव्हर होताच त्याने फोनचे 46 हजार रुपये भरण्यास सांगितले.

    हेही वाचा :  आणखी एक श्रद्धा! प्रेमप्रकरणातून तरुणीसोबत भयानक कांड; 25 दिवसानंतर पोलिसांनी विहिरीतून काढले मृतदेहाचे तुकडे

    तीन दिवस मृतदेह घरातच  

    हेमंत नाईक पैशासाठी दारात थांबला, मात्र हेमंत दत्ताने त्याला घरात बोलावून घेतलं. नाईक आत येताच दत्ताने त्याच्यावर चाकूने वार केले. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे त्याला समजत नव्हतं. त्यामुळे त्याने मृतदेह 3 दिवस घरातच ठेवला होता.

    हेही वाचा : बाळूमामाच्या यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 3 जण ठार, 4 गंभीर जखमी

    तीन दिवसांनंतर संधी मिळाल्यानंतर तो मृतदेह पोत्याने झाकून स्कूटीवरून पहाटे साडेचारच्या सुमारास विल्हेवाट लावण्यास निघाला. नंतर दत्ताने नाईकचा मृतदेह थेट अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळील निर्जन भागात नेला. तिथे त्याने स्कूटीवरून मृतदेह खाली उतरवला आणि जाळून टाकला.

    हत्येची कबुली 

    डिलिव्हरी बॉय नाईकला देण्यासाठी त्याच्याकडे 46 हजार रुपये नव्हते आणि त्याला आयफोन पाहिजे होता, त्यामुळे त्याने डिलिव्हरी बॉयला मारण्याचा कट रचला, असं पोलीस चौकशीत हेमंत दत्ताने सांगितलं. तर, पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना रेल्वे स्थानकाजवळ जळालेला मृतदेह सापडला तेव्हा ते शोधण्यासाठी त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये आरोपी त्याच्या स्कूटीवर मृतदेह घेऊन जाताना दिसला होता. त्यानुसार त्याला अटक केली होती.

    First published:
    top videos

      Tags: Crime, Crime news, Iphone, Karnataka, Murder