जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आणखी एक श्रद्धा! प्रेमप्रकरणातून तरुणीसोबत भयानक कांड; 25 दिवसानंतर पोलिसांनी विहिरीतून काढले मृतदेहाचे तुकडे

आणखी एक श्रद्धा! प्रेमप्रकरणातून तरुणीसोबत भयानक कांड; 25 दिवसानंतर पोलिसांनी विहिरीतून काढले मृतदेहाचे तुकडे

प्रेमसंबंधातून हत्या

प्रेमसंबंधातून हत्या

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रेमप्रकरणातून हत्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नासाठी दबाव टाकल्यानं प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 20 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रेमप्रकरणातून हत्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. या हत्याकांडाने देश हादरला होता. ही घटना चर्चेत असतानाच पुन्हा एकदा दिल्लीमध्ये निक्की यादव या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केली. निक्कीची हत्या करून त्याने तिचा मृतदेह एका ढाब्यामध्ये असलेल्या फ्रिजमध्ये ठेवला आणि दुसरं लग्न देखील केलं. त्यानंतर आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामधील ही घटना आहे. प्रेयसी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे प्रियकराने तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्याने हे तुकडे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. प्रेमसंबंधातून हत्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि हत्या झालेल्या महिलेचे प्रेमसंबंध होते. ही महिला आरोपीकडे लग्नासाठी हट्ट करत होती. यातूनच वाद झाला आणि आरोपीने या महिलेची हत्या केली. या तरुणीच्या कुटुंबीयाने तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तपास सुरू केला. या प्रकरणात तरुणीचा प्रियकर असलेल्या अनूपराम याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने हत्येची कबुली दिली आहे. हेही वाचा :  निक्की हत्याकांडात मोठा खुलासा! साहिलच्या वडिलांचाही सहभाग; मृतदेह लपवण्यासाठी पोलिसाची मदत विहीरीत आढळले मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेची हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून त्याने ते डेरवा गावच्या परिसरात असलेल्या एका विहीरीमध्ये टाकले होते. हत्येच्या 25 दिवसानंतर या विहीरीमधून पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. ज्या महिलेची हत्या झाली तिचा विवाह झाला होता, मात्र तरी देखील तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी वीस जानेवारी रोजी सासरी जाते असं सांगून तिच्या माहेरहून निघाली होती, मात्र तीची हत्या करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात