मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ब्लॉगर तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडल्याने जागीच मृत्यू; हत्येमागील दोन धक्कादायक पैलू CCTV मधून उघड

ब्लॉगर तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडल्याने जागीच मृत्यू; हत्येमागील दोन धक्कादायक पैलू CCTV मधून उघड

लग्न...लिव्ह इन रिलेशन यांसारख्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

लग्न...लिव्ह इन रिलेशन यांसारख्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

लग्न...लिव्ह इन रिलेशन यांसारख्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली, 25 जून : आग्राच्या (Agra News) ओमश्री प्लॅटिनम अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 401 मध्ये फेसबुक फ्रेंड विपुलसह लिव्ह इनमध्ये राहणारी फूड आणि फॅशन ब्लॉगर रितिका सिंहने जीव (Murder of food and fashion blogger Hrithika Singh) वाचवण्यासाठी बराच संघर्ष केला. पती आकाशने येताच तिला मारहाण केली. विपुल तिला वाचवण्यासाठी आला तर आकाश आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे हात-पाय बांधून बाथरूममध्ये बंद केलं. तो आरडाओरडा करू लागला. मात्र कोणीच मदतीसाठी आलं नाही. दुसरीकडे रितिकाचेही हात-पाय बांधले होते. तीदेखील स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत होती. इमारतीमधील कोणालाच याबाबत कळालं नाही हे दुर्देवं आहे.

यानंतर रितिकाला चौथ्या मजल्यावरुन फेकून देण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीत विपुलने ही धक्कादायक माहिती दिली. आकाश पुरी हा संपूर्ण तयारीनिशी आला होता. आकाशने सकाळी 10.36 वाजता दोन महिलांसह अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरला. ज्यामुळे कोणालाच संशय आला नाही. सीसीटीव्हीमध्ये या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या आहेत.

सुरुवातीला गार्डने त्याला थांबवलं. त्यावेळी आकाश महिलेसोबत आत शिरला. त्याने सुनीलाचं नाव लिहित फ्लॅट क्रमांक 601 मध्ये जाणार असल्याचं सांगितलं. मात्र त्याला 401 मध्ये जायचं होतं. गार्डला त्याच्याबद्दल योग्य माहिती मिळू नये, यासाठी तो खोटं म्हणाला. त्यानंतर पुढील 15 ते 20 मिनिटात अपार्टमेंटच्या मागील भागातून काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला.

" isDesktop="true" id="722760" >

लोकांनी पाहिलं रितिका गाली पडली होती. यानंतर पळून जाणारा आकाश आणि त्याच्या साथीदार महिलांना पकडण्याक आलं. लोक फ्लॅटमध्ये पोहोचले तर विपुलला बंद करुन ठेवण्यात आलं होतं. पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. टीमने फ्लॅटचा तपास सुरू केला. फ्लॅटमधील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. केसांचा पुंजादेखील होता.

First published:
top videos

    Tags: Facebook, Murder