मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जुन्या वादातून तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या, मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO

जुन्या वादातून तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या, मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO

वसंत कुमार देवेंद्र या तरुणाचा काही दिवसांपूर्वी त्याच्या परिसरात राहणाऱ्या इतर तरूणांशी वाद झाला होता.

मुंबई, 31 मे : मुंबईतील (Mumbai) वडाळ्यात (Wadala) जुन्या वादातून एका 31 वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरी आगार येथील न्यू माडा इमारतीत 30 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  वसंत कुमार देवेंद्र (वय31) असं मृत तरुणाचं नाव आहे. वसंत कुमार देवेंद्र या तरुणाचा काही दिवसांपूर्वी त्याच्या परिसरात राहणाऱ्या इतर तरूणांशी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून 30 मे रोजी रात्री साडेदहा वाजता वसंतकुमार याच्याजवळ दोन तरुण येऊन त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली होती. 'चीनमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; वटवाघळाचा फक्त बहाणा' या नंतर वादाचा परिणाम मारामारीत झाल्यानंतर मारेकरी दोन तरुण आणि त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याने वसंतकुमार याच्या अंगावर वार केले असता, त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या