मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारू पार्टीमध्येच मित्राचा केला खून; अवघ्या 10 रुपयांमुळे सुरू झाला वाद आणि... 

दारू पार्टीमध्येच मित्राचा केला खून; अवघ्या 10 रुपयांमुळे सुरू झाला वाद आणि... 

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

अवघ्या १० रुपयांवरुन तिघांमध्ये वाद सुरू झाला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

राहूल खंदारे/ बुलढाणा, २७ ऑक्टोबर : मलकापूर (Malkapur News) येथे दारू पिण्यासाठी १० रूपये न दिल्याने मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दोन मित्रांनी तिसऱ्याच्या डोक्यात लाकडी राफ्टर मारून खून केल्याचं मलकापूरच्या मुक्ताईनगर रोडवरील सरकारमान्य दारूविक्री दुकानाजवळ घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करीत एका तासात आरोपींना अटक केली आहे. (Murder of a friend at a liquor party The controversy started with just 10 rupees)

शहरातील मुक्ताईनगर रोडवर सरकारमान्य दारूविक्री दुकान असून या दुकानात भागवत सिताराम फासे (वय ५५) रा.हिंगणा काझी, विनोद लक्ष्मण वानखेडे (वय ४०), दिलीप त्र्यंबक बोदडे (वय ३५) हे तिघे मित्र दारू पिण्यास गेले होते. यावेळी विनोद वानखेडे व दिलीप बोदडे या दोघांनी भागवत फासे यांच्याकडे दारू पिण्यासाठी १० रूपयांची मागणी केली. मात्र फासे यांनी पैसे दिले नाही.

हे ही वाचा-बेपत्ता वडिलांची तक्रार द्यायला गेला अन् समोरच दिसला मृतदेह; नागपुरातील घटना

त्यानंतर फासे दुकानातून बाहेर आले. यानंतर वानखेडे व बोदडे या दोघांनी फासे यांनी पैसे न दिल्याचा राग डोक्यात ठेवून त्यांच्या डोक्यात लाकडी राफ्टर मारले. लाकडी राफ्टरचा वार हा जबरदस्त असल्याने भागवत फासे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतकाची ओळख पटवली.

दरम्यान आरोपी हे फरार झाले होते. गोपनीय पोलिस पथकाने तातडीने तपासचक्रे फिरवित दोन्ही आरोपींना पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी गुन्हा कबुल केला. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन मलकापूरला मृतकाचा मुलगा निना भागवत फासे (३०) याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Alcohol, Buldhana news, Crime news, Murder