Home /News /crime /

मटणाचे पैसे मागितल्याचा आला राग, केली दुकानदाराची हत्या

मटणाचे पैसे मागितल्याचा आला राग, केली दुकानदाराची हत्या

आपल्याकडे दुकानदाराने (Shopkeeper) मटणाचे पैसे (Money for mutton) मागितल्याचा राग आल्यामुळे एकाने मटण विक्रेत्याची हत्या (murder) केल्याची घटना समोर आली आहे.

    भोजपूर, 1 सप्टेंबर : आपल्याकडे दुकानदाराने (Shopkeeper) मटणाचे पैसे (Money for mutton) मागितल्याचा राग आल्यामुळे एकाने मटण विक्रेत्याची हत्या (murder) केल्याची घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत (drunken) मटण विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने पाच किलो मटणाची मागणी केली. मात्र त्या बदल्यात पैसे देण्यास नकार दिला. पैसे नसल्याने दुकानदाराने मटण देण्यास नकार दिल्याचा राग अनावर होऊन त्या व्यक्तीने थेट दुकानदारावरच हल्ला चढवला. अशी घडली घटना बिहारच्या (Bihar) भोजपूर (Bhojpur) जिल्ह्यातील एकवारी गावात अयोध्या साह यांचं मटण आणि मासे विक्रीचं दुकान होतं. नेहमीप्रमाणं मंगळवारीदेखील ते आपल्या दुकानात मासे आणि मटणाची विक्री करत होते. त्याचवेळी गावातील चौधरी नावाची व्यक्ती दारूच्या नशेत तिथे आली आणि पाच किलो मटण मागितले. त्याचे पैसे आपण देणार नसून दुकानदाराने आपल्याला फुटकात मटण द्यावे, अशी त्याची मागणी होती. त्याला नकार दिल्यानंतर चौधरीने साह यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्याने काही सहकाऱ्यांनादेखील बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून अगोदर प्रचंड मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी साह यांच्या शरीरावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या साह यांना नदीकिनारी फेकून सर्वांनी तिथून पोबारा केला. हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू या घटनेची कल्पना आजूबाजूच्या नागरिकांनी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत साह यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पटनाला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पटनाला नेत असताना वाटेतच साह यांचा मृत्यू झाला. हे वाचा - डुकराच्या शिकारीवरुन दोन गटांत वाद, चाकूने भोसकून एकाची हत्या पोलीस तपास सुरू पोलिसांनी चौधरीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या खुनामागे केवळ मटणाचे कारण होते की इतर काही निमित्त होते, याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र मटणाच्या पैशाच्या किरकोळ कारणावरून विक्रेत्याचा थेट खून झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Murder

    पुढील बातम्या