• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • डुकराच्या शिकारीवरुन दोन गटांत वाद, आठ दिवसांपूर्वीच बाप बनलेल्या रवीचा झाला घात

डुकराच्या शिकारीवरुन दोन गटांत वाद, आठ दिवसांपूर्वीच बाप बनलेल्या रवीचा झाला घात

डुकराच्या शिकारीवरुन झालेल्या वादानंतर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:
बीड, 1 सप्टेंबर : डुकराच्या पिल्याच्या शिकारीवरून वराहपालन करणाऱ्या दोन गटांत हाणामारी (Clash between two group) झाली आहे. एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईतील वडारवाडा भागात उघडकीस आली आहे. रवी अभिमन्यू उर्फ अभिमान धोत्रे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात 11 जणांवर गुन्हा (11 people booked) नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या वादात हल्लेखोरांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लातूरला हलवण्यात आले आहे. रवीच्या कुटूंबाचा मुक्त वराह पालनाचा व्यवसाय आहे. वडारवाडा भागातील सर्व वराह धोत्रे यांची आहेत. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून राहणाऱ्या सिकलकरी समाजाच्या लोकांचाही वराह पालनाचा व्यवसाय आहे. मंगळवारी दुपारी सिकलकरी समाजाचे दिपसिंग टाक, हिंमतसिंग उर्फ डागासिंग आणि विरूसिंग घोके हे तिघे धोत्रे यांच्या घरासमोर आले आणि एक डुकराचे पिल्लू मारले. यावेळी रवी धोत्रे यांने आमचे डुक्कर का मारले असा जाब विचारला. तेव्हा तुमचे कशाचे डुक्कर, आमचेच डुक्कर असे म्हणत त्या तिघांनी वाद घालण्यास सुरूवात केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून इतर साथीदारांना बोलवून घेतले असता ते तलवार, जांबिया, चाकू, खंजीर, काठ्या घेऊन दुचाकीवरून धोत्रे यांच्या घरासमोर आले. आमच्या माणसांना का पकडून ठेवले म्हणून दिपसिंग आणि हिंमतसिंग यांनी धारदार शस्त्राने रवीला भोसकले . रवीला वाचविण्यासाठी धावत आलेला भाऊ दिलीप, वडील अभिमन्यू यांनाही हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यावेळी आरडाओरडा ऐकून धोत्रे यांचे इतर नातेवाईक धावत येत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. कुटूंबियांनी तत्काळ गंभीर जखमी झालेल्या रवीला स्वाराती रूग्णालयात दाखल केले. परंतु , तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. दिलीप धोत्रे यांनी दिलेल्याफिर्यादीवरून सर्व 11 आरोपींवर कलम 302, 323, 324, 427, 143, 147, 148, 149 शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम 4,24 अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान या मारहाणीत दोन हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. रवीच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात काही वेळ ठिय्या केला होता. पोलिसांनी समजूत काढल्यावर नातेवाईक शांत झाले, मात्र रवी धोत्रे यांना आठ दिवसापूर्वीच कन्यारत प्राप्त झाले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच रवीची हत्या झाली. रवीच्या मृत्यूनंतर ही मुलगी वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published: