मुंबई, 03 जुलै : नालासोपाऱ्यातील महिलेच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. महिलेस ठार मारून तिच्यावर अत्याचार केला असल्याची माहिती पोलिसांनी समोर आणली होती. त्यानुसार एका आरोपी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली असून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका इथं प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या महिलेच्या खुनाचं गूढ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं उकललं. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नालासोपारा पुर्व चंदन नाका, झालावड पार्कसमोर मयत नगीना आशिष यादव, (32) या 27 जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने तुळींज पोलीसठाण्यात केली होती.
26 जूनला नगीना या काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या त्या प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानात शिवा नागाराम चौधरी 30 याच्याशी किमतीवरून बाचाबाची झाली. त्याच वेळी शिवा याने तिच्या केसांना धरून दुकानाच्या आतील रूममध्ये नेवून तिचा गळा दाबून चाकूने वार केला आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला.
वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोडली नोकरी, IPS नीरज जादौन यांची संघर्षगाथा
मिळालेल्या माहितीनुसार, त्याने तिचं प्रेत एका प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून रात्री 2 ते 3 च्या सुमारास खांद्यावर घेवून चंदन नाका इथल्या एका बंद असलेल्या महिंद्रा पिकप टेम्पो क्र, एम.एच. ०4 डी.एस. 0090 या मध्ये टाकण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह स्थानिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.
बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध करियोग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन
या प्रकरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तर पालघर पोलीस अधीक्षक, दत्तात्रेय शिंदे, वसई अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, नालासोपारा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, सुहास कांबळे, संजय नवले, प्रशांत पाटील मनोज सकपाळ, शरद पाटील, जनार्दन मते, विकास यादव, रमेश अलदर, मुकेश तटकरे,गोविंद केंद्रे, शिवाजी पाटील सागर बारवकर,अमोल तटकरे, प्रशांत ठाकूर, अश्विन पाटील, अमोल कोरे यांनी सापळा रचून सीसीटिव्हीफुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी शिवा नगाराम चौधरी,३० याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपादन - रेणुका धायबर