जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध करियोग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध करियोग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

बॉलिवूडवर शोककळा! सुप्रसिद्ध करियोग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

काही दिवसांपूर्वी सरोज यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचं मुंबईत निधन झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मध्य रात्री त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी सरोज यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 72 व्या वर्षी सरोज खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे नृत्य दिग्दर्शित केलं होतं.

जाहिरात

सरोज खानने बॉलिवूडमध्ये हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे. 1983 साली त्यांनी ‘हिरो’ चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कलंक’ हा आहे. याशिवाय त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा,  तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका " या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात