जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / आता हे काय नवं संकट! Omicron corona नंतर Florona ची दहशत; Israel मध्ये सापडला पहिला रुग्ण

आता हे काय नवं संकट! Omicron corona नंतर Florona ची दहशत; Israel मध्ये सापडला पहिला रुग्ण

आता हे काय नवं संकट! Omicron corona नंतर Florona ची दहशत; Israel मध्ये सापडला पहिला रुग्ण

कोरोना ओमिक्रॉननंतर आता फ्लोरोनाचा (Florona) रुग्ण सापडला आहे. इस्राइलमध्ये (Israel) फ्लोरोनाचं पहिलं प्रकरण आढळलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तेल अवीव, 31 डिसेंबर : एकिकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन जगभर थैमान घालतो आहे. अशात आता आणखी एक नवा आजार येऊन ठेपला आहे. कोरोना ओमिक्रॉननंतर आता फ्लोरोनाचा (Florona) रुग्ण सापडला आहे. इस्राइलमध्ये (Israel) फ्लोरोनाचं पहिलं प्रकरण आढळलं आहे. त्यामुळे आता या आजाराने जगभरात खळबळ उडवली आहे (Florona in Israel). इज्राइलमध्ये एका रुग्णाला फ्लोरोनाची लागण झाली आहे. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की हा फ्लोरोना नेमका आहे तरी काय? तर फ्लोरोना म्हणजे कोरोना (corona)  आणि इन्फ्लुएंझा (Influenza)  यांचा दुहेरी संसर्ग आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. याचदरम्यान इज्राइलच्या नॅशनल हेल्थ प्रोव्हायडरने कोरोना लशीचा चौथ्या डोसबाबत शुक्रवारी अभ्यास सुरू केला आहे. कमजोर इम्युनिटी असलेल्या रुग्णांना हा डोस देण्यात आला आहे. हे वाचा -  आता ओमिक्रॉनचं निदान अधिक सोपं; त्वचेवरही दिसतंय Omicron symptoms इस्राइलचे पंतप्रधान (Israeli PM) नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी सांगितलं की, इज्राइलमध्ये सर्वात आधी सामान्य जनतेला कोरोना लशीचा तिसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता चौथ्या डोसची तयारी केली जाते आहे. चौथी लस देण्यात इस्राइल सर्वात पुढे असेल. टाइम्‍स ऑफ इजराइलच्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल नचमन ऐश यांनी ज्या लोकांनी कोरोना लशीचा तिसरा डोस घेतला आहे आणि ज्यांची इम्युनिटी कमजोर आहे त्यांना बुस्टर डोस घेण्याची परवानगी दिली. हे वाचा -  Omicron च्या 156 पैकी फक्त 9 जण हॉस्पिटलमध्ये, लस घेणाऱ्याचा नवा रिपोर्ट! इस्राइलमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. आरोग्यमंत्री नित्जन होरोविट्ज यांनी इस्राइल कोरोनाच्या पाचव्या लाटेत असल्याचं सांगितलं होतं. इथं सर्वाधिक केसेस ओमिक्रॉन व्हेरिएंटची होती. कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने मोठं पाऊल उचललं होतं. कोरोनाला वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला. इथं वृद्ध सेवा सेंटरमध्ये वृद्धांनाही कोरोना लस देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात