मुंबई 11 डिसेंबर : मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलाने केलेलं कांड जाणून तुम्हीही हैराण व्हाल. यात एका 17 वर्षीय मुलाने आपल्याच वयाच्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तो आणि पीडिता एकाच परिसरात राहत होते आणि एकमेकांना ओळखत होते. जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच… खार पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने मुलीला किसिंग सेल्फीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितलं की मुलगी आणि मुलगा एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. 10 ऑक्टोबर रोजी वांद्र्याच्या कार्टर रोड भागात वाढदिवस साजरा करताना मुलाने दोघांचा किस करतानाचा सेल्फी काढला होता. हा सेल्फी व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत आरोपीने 17 वर्षीय तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला. नुकताच तो थेट मुलीच्या कॉलेजमध्ये पोहोचला तेव्हा ही घटना उघड झाली. यावेळी तरुणीने त्याच्यासोबत बाहेर जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर हल्ला केला. मुलीच्या मित्राने तिच्या पालकांना हल्ल्याची माहिती दिली. याबाबत विचारणा केली असता मुलीने संपूर्ण प्रकरणाची माहिती आपल्या पालकांना दिली. आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कार्टर रोडवर घडली, त्यामुळं हे प्रकरण खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अल्पवयीन आरोपीला शुक्रवारी त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. खार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीला डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.