मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाचा जीवघेणा स्टंट; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल, पाहा VIDEO

धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाचा जीवघेणा स्टंट; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल, पाहा VIDEO

Crime in Mumbai: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक तरुण धावत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणा स्टंट (stunt on running car) करत आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 जानेवारी: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक तरुण धावत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणा स्टंट (stunt on running car) करत आहेत. हा धक्कादायक प्रकार बांद्रा वरळी सी लिंकवर (Bandra Worli Sea Link) घडला आहे. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशानं या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी धावत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक (2 accused arrested) केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

इमरान झहीर आलम अन्सारी (27) आणि गुलफाम सबीर अन्सारी (25) असं अटक केलेल्या दोन तरुणांची नावं आहेत. कारच्या नंबर प्लेटच्या  पोलिसांनी तपास करत मंगळवारी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी सोमवारी रात्री बांद्रा ते वरळी दरम्यान असणाऱ्या सी लिंकवर गेले होते. याठिकाणी एक आरोपी कारच्या बोनेटवर बसला होता. तर अन्य आरोपी वेगानं कार चालवत होता.

हेही वाचा-50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य अन्...

दरम्यान, या सी लिंकवरून जाणाऱ्या एका प्रवाशानं संबंधित घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. तसेच हा व्हिडीओ ट्वीट करून यामध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे इमरान आणि गुलफाम या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी कलम 279 (धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे व वाहतूक नियमांचं पालन न करणे) आणि कलम 336 (वाहन चालवताना स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणे) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Mumbai case, Mumbai News, Mumbai police, Stunt video