मुंबई, 3 एप्रिल: नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ (Milk Adultration) करुन विक्री करण्याऱ्या टोळीचा गुन्हे शाखेन पर्दाफाश केला आहे. मुंबईतील (Mumbai) दहिसरमधील (Dahisar) वीर संभाजी नगरमध्ये छापा घालून टोळीला गजाआड केले. या कारवाईत 122 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. दहिसर येथील वीर संभाजीनगर येथील एका खोलीत आरोपी सायदुल कावेरी भेसळयुक्त दूध तयार करत हरोता. नामांकित दुधाच्या कंपनीच्या पिशव्यांमधून आरोपी काही प्रमाणात दूध बाहेर काढायचे त्यात घाण पाणी भरायचे. त्यानंतर स्टोव्ह पिन मेणबत्तीवर गरम करून पिशव्या पुन्हा सील करायचे. हे घाण पाणी मिश्रित दूध ही टोळी आसपासच्या परिसरात विकायची. पांढऱ्या दुधाच्या काळाबाजाराची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून या टोळीला रंगेहाथ पकडलं. या टोळीकडून 122 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे.
चोरीच्या उद्देशानं आले मात्र वृद्धाचे हात पाय बांधून केली निर्घृण हत्या, घटना CCTV मध्ये कैदआरोपींविरधात भारतीय दंड संहिते अंतर्गत 420, 468, 272,483,482 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दूध भेसळ करणाऱ्यांचे अड्डे प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात आढळतात. दहिसरमधील वीर संभाजी नगरमध्ये छापा टाकल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. अशा आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत का? पोलीस याचा शोध घेत आहेत. दुधाचा काळाबाजार करण्याऱ्या अनेक टोळ्या पोलिसांनी पकडल्या आहेत. मात्र दुधाचा काळाबाजार करण्याऱ्या टोळ्या काही थांबत नाहीत. त्यामुळे घाण पाणी मिश्रित दूध पिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.