मुंबई 20 ऑक्टोबर : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा येथील इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. कारसाठी 21 वर्षीय तरुणाने कुटुंब टाकलं धोक्यात; आता खातोय तुरुंगाची हवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी घडली. यात प्रसिद्ध व्यावसायिक पारस पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्याहून उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेत पोरवाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांना त्यांची सुसाईट नोटही सापडली आहे. सुसाईड नोटवरुन पोरवाल यांनी आर्थिक तोट्यामुळे आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी या आत्महत्येसाठी इतर कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणाचीही चौकशी करू नका, अशी मागणी त्यांनी सुसाईड नोटमध्येच केलेली आहे. सुसाईड नोट लिहून त्यानी इमारतीवरुन उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक पोरवाल यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं, की या प्रकरणात त्यांना कोणावरही संशय नाही. तसंच सुसाईड नोटमधील अक्षरही पोरवाल यांचंच असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.