जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Mumbai : अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत; स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार

Mumbai : अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत; स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार

Mumbai : अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत; स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार

या घटनेनंतर पोलिसांनी तपास अधिक कडक केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नायगाव, 26 ऑगस्ट : वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या कडेला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग स्थानिकांना दिसली होती. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीच्या पोटावर धारधार वस्तूने हल्ला केल्याच्या खुणा पोलिसांना दिसून आल्या आहेत. वर्धा : 7 वर्षाच्या नातीवर 70 वर्षांच्या वासनांध आजोबाकडून लैंगिक अत्याचार, घटनेने खळबळ या प्रकरणी वालिव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून नुकतीच हत्या केल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला असून तिच्या शाळेच्या गणवेशावरून मुलीचे नाव निष्पन्न झाले आहे. सदर मुलीची अंधेरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह बॅगमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत ही बॅग सापडली. मृतदेहावर चाकूने वार केले होते. तिची हत्या करून मृतदेह लपवण्यासाठी या झाडांमध्ये आणून टाकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात