मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

इंस्टाग्रामची मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन ठिकाणी तीन वेळा बलात्कार

इंस्टाग्रामची मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन ठिकाणी तीन वेळा बलात्कार

Mumbai Crime: एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत (Single Night)तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप (Gangraped)झाल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime: एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत (Single Night)तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप (Gangraped)झाल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime: एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत (Single Night)तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप (Gangraped)झाल्याची घटना समोर आली आहे.

    मुंबई, 06 जून: मुंबईत (Mumbai Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत (Single Night) तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप (Gangraped) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून दोन जणांचा शोध अद्याप सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपींची मैत्री ही इंस्टाग्रामवर झाली होती. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार आणि गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून दोन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे. ही धक्कादायक घटना 31 मे आणि 1 जूनच्या रात्री घडली. 16 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबियांनी मालाड पश्चिमच्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तात्काळ अपहरणाची तक्रार दाखल करत तपास सुरु केला. हेही वाचा- कारमध्ये पती जिवंत जळाला, 35 दिवसांनी पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल दरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी पीडित मुलगी स्वतःहून घरी परतली. ज्यावेळी ती घरी परतली तेव्हा खूप घाबरलेली आणि कमजोर दिसत होती. पीडित मुलीची तिच्या आई-वडिलांनी विचारपूस केली. मात्र तिनं काही सांगितलं नाही. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांची टीम तिच्या घरी पाठवण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनाही पीडित मुलीनं काही सांगितलं नाही. मात्र त्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर पीडित मुलीची मैत्री काही मुलांसोबत झाली होती. त्यापैकी एका मित्रानं बर्थडे पार्टी ठेवली होती. सर्वजण मड भागातल्या एका हॉटेलच्या बाहेर भेटले आणि तिथे त्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला. त्यानंतर कारमध्ये ही एक केक कापण्यात आला. तेव्हा इंस्टाग्रामवरील दोन मित्रांनी पीडितेला कारमध्ये नेलं आणि तिच्यावर गँगरेप केला. हेही वाचा- लातूरात सुनेनं केला सासूचा खून, संशयाची सुई फिरताच हत्येचा झाला उलगडा या घटनेनंतर पीडित मुलीला मालाडमधील एका दुसऱ्या मित्राच्या घरी सोडण्यात आलं. येथेही तिच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी घरी न जाता आपल्या एका मित्राच्या घरी गेली. तिथे देखील मित्रानं तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गँगरेप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी 18 ते 23 या वयोगटातील आहेत. पोलिसांनी सांगितलं की, सर्व जणांची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोन आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. तसंच सर्व आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gang Rape, Mumbai News, Rape

    पुढील बातम्या