जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बाळाच्या जन्मासाठी 16 महिन्यांची कैद आणि अत्याचार; नागपूरच्या तरुणीसोबत घडला थरकाप उडवणारा प्रकार

बाळाच्या जन्मासाठी 16 महिन्यांची कैद आणि अत्याचार; नागपूरच्या तरुणीसोबत घडला थरकाप उडवणारा प्रकार

Representative Image

Representative Image

नागपूरमधील तरुणी उज्जैनच्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. 5 दिवसांनी शुद्ध आल्यानंतर तिने भयंकर प्रकार कथन केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

उज्जेन, 12 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जेनमधून एक अत्यंत भयावह (Shocking News) प्रकरण समोर आलं आहे. पीडितेसोबत असं कृत्य करण्यात आलं जे वाचून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एका दाम्पत्याने 19 वर्षीय तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त (Crime News) केलं. यानंतर मरणासाठी रस्त्यावर सोडून दिलं. नागपूरमधील 19 वर्षीय तरुणीसोबत उज्जेनच्या एका दाम्पत्याने धक्कादायक (women harasment) कृत्य केलं. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी 19 वर्षीय तरुणी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत दिसली. सुरुवातील तर तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. सर्वात आधी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 दिवसांनंतर तिला शुद्ध आली. येथे समुपदेशनादरम्यान तरुणीने खुलासा केला. पीडितेने यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तिने सांगितलं, अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केला जात होता. सोबतच सरोगसीसाठी जबरदस्तीही केली जात होती. पीडितेने सांगितलं की, आरोपी सिंहच्या पत्नीने दोन मुलांनंतर नसबंदी केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर दाम्पत्याला बाळाची अपेक्षा होती. यानंतर आरोपी सिंह आणि तिच्या पत्नीने उज्जेनपासून 60 किमी लांब नागदा येथील एका मुलीला 1 महिन्यापूर्वी खरेदी केली. हा तस्करीचा प्रकार असल्याचं तरुणीला माहिती नव्हतं. तिला नागदाहून उज्जैन येथे आणण्यात आलं. येथे दाम्पत्याने तिला घरात कैद केलं आणि महिनो महिने तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हे ही वाचा- Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा पीडितेने सांगितलं की, तिला आधी आरोपीने बहिणीच्या घरी ठेवलं होतं. यानंतर तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. येथे तिच्यावर बलात्कार केला जात होता. यादरम्यान पीडिता गर्भवती झाली तर आरोपीची आई आणि पत्नीने तिची काळजी घेण्यास सुरुवात केली. तिची नियमित तपासणी केली जात होती. यादरम्यान आरोपी राजपाल सिंहची 42 वर्षीय पत्नीने गर्भवती होण्याचं नाटक केलं. ज्यातून शेजारच्यांनाही घरात पाळणा हलणार असल्याचं कळावं. 9 महिन्यांंनतर पीडितेला एक रुग्णालयात सिंह याच्या पत्नीच्या नावाने दाखल करण्यात आलं. येथे ऑपरेशन केल्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. डिलिव्हरी झाल्यानंतर रस्त्यावर दिलं फेकून आरोपीने पीडितेकडून बाळ घेतलं. सर्जरी केल्यानंतर तिला संसर्ग झाला होता. त्याच अवस्थेत मरणासाठी तिला देवास गेटवर फेकून देण्यात आलं. पीडितेने हा खुलासा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सांगितलं. पीडिता ही नागपूर येथील राहणारी असून तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात