जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्याच पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्याच पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दोन जुळ्या भावातील (Twins in Latur) एकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. त्यामुळे घरातील नवविवाहित मुलीला आपला नवरा आणि दीर कोण आहे ते यातील फरकच कळला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 23 मे : लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latur Crime News) जुळे भाऊ असण्याचे अनेक फायदे-तोटे तुम्ही वाचले असतील, ऐकलेही असतील. (Twins Crime News) मात्र, लातूर जिल्ह्यामध्ये जुळे असल्याचा फायदा घेत एक धक्कादायक कृत्य केले गेले आहे. (Twins Crime News Latur) दिवसेंदिवस अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जुळे असल्याचा फायदा घेत, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यात जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. (Twins in Latur) याचाच फायदा घेत भावाच्याच पत्नीवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. विवाहितेचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ही घटना लातुरातील रिंगरोड परिसरात घडली. या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पीडितेचा पती आणि दिराला अटक केली आहे. सहा महिन्यांनी आला प्रकार समोर - दोन जुळ्या भावातील (Twins in Latur) एकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. त्यामुळे घरातील नवविवाहित मुलीला आपला नवरा आणि दीर कोण आहे ते यातील फरकच कळला नाही. याचाच फायदा घेत धक्कादायक कृत्य करण्यात आले आहे. जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवरच अत्याचार केला. याहूनही धक्कादायक म्हणजे, सहा महिन्यांनी पीडितेच्या हा प्रकार लक्षात आला. पीडितेचा नांदायला नकार - ही तरुणी माहेरी गेली होती. यावेळी तिचा जुळा दीर घ्यायला गेला असता तिने सासरी जाण्यास नकार दिला. यानंतर तिला तिच्या आई वडिलांनी सासरी नांदायला न जाण्याचे कारण विचारले. यावेळी तिने आपल्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी या परिस्थितीत आपल्या मुलीला मानसिक आधार दिला. हेही वाचा -  Bhokardan Crime : पत्नी घरी नसल्याने त्याने साधला डाव, विवाहित महिलेवर पहाटे अत्याचार

यानंतर याप्रकरणी लातुरातीलच शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पीडित विवाहित तरुणीने तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरुन पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही जुळ्या भावांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात