Home /News /crime /

आईनंच 15 वेळा चाकूनं वार करून केली 5 वर्षीय मुलीची हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

आईनंच 15 वेळा चाकूनं वार करून केली 5 वर्षीय मुलीची हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

एका आईनंच आपल्या पाच वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या (Mother Killed her Daughter) केली आहे. 36 वर्षीय सुथा शिवनाथम हिला पोलिसांनी (Police) याप्रकरणी अटक केली आहे

    लंडन 25 जून : एक अतिशय हृदयद्रावक आणि भयंकर प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एका आईनंच आपल्या पाच वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या (Mother Killed her Daughter) केली आहे. 36 वर्षीय सुथा शिवनाथम हिला पोलिसांनी (Police) याप्रकरणी अटक केली असून सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही घटना ब्रिटनची राजधानी लंडन (London) येथील आहे. न्यायालयात (Court) सुनावणीदरम्यान असं समोर आलं आहे, की सुथा शिवनाथमनं आपल्याच मुलीची चाकूनं भोसकून हत्या केली, कारण तिला भीती होती, की आपला कोरोनानं (Coronavirus) मृत्यू होणार आहे आणि यानंतर मुलगी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. वटपोर्णिमेदिवशीच पती जीवावर उठला; धारदार शस्त्रानं केले वार, मुलीचाही कान कापला रिपोर्टनुसार, सुथा शिवनाथम हिनं आपल्या दक्षिण लंडनमधील फ्लॅटच्या बेडरुममध्ये मुलगी सयागी शिवनाथम हिच्यावर चाकूनं 15 वेळा वार केले आणि तिची हत्या केली. यानंतर तिनं स्वतःवरही चाकूनं वार केले. यानंतर शेजाऱ्यांनी दोघींनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. न्यायालयात सुनावणीदरम्यान मुलीचे वडील सुगंथन शिवनाथम यांनी सांगितलं, की कोरोना महामारी आणि निर्बंधांचं त्यांच्या पत्नीवर अतिशय वाईट परिणाम झाला. इंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं मृत मुलीच्या वडिलांनी म्हटलं, की त्यांच्या पत्नीला अशी भीती होती की तिला कोरोना होईल आणि तिचा मृत्यू होईल. यानंतर ती जोरजोरानं रडू लागली. सुथा शिवनाथम आणि सुगंथन यांचं 2006 मध्ये लग्न झालं आहे. यानंतर हे कुटुंब लंडनमध्ये राहू लागलं. सुथा शिवनाथमवर उपचार कऱणाऱ्या एका मनोरुग्ण चिकित्सकानं सांगितलं, की महामारी आणि लॉ़कडाऊनचा तिच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे आणि सोशल आयसोलेशनमुळे याचं गंभीर मानसिक आजारात रुपांतर झालं आहे. सुथाच्या पतीनं सांगितलं, की या घटनेनंतर तिच्याशी बोललेलो नाही. मात्र, मला माहिती आहे, की या घटनेसाठी ती जबाबदार नाही. ती ठीक असती, तर तिनं आमच्या मुलीला कधीच मारलं नसतं, असं तिच्या पतीनं म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या