Home /News /maharashtra /

वटपोर्णिमेदिवशीच पती जीवावर उठला; धारदार शस्त्रानं केले सपासप वार, मुलीचाही कान कापला

वटपोर्णिमेदिवशीच पती जीवावर उठला; धारदार शस्त्रानं केले सपासप वार, मुलीचाही कान कापला

Crime in Solapur: 'हाच पती जन्मोजन्मी मिळावा' यासाठी वटपोर्णिमा दिवशी प्रार्थना करणाऱ्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्रानं वार केले आहेत.

    अक्कलकोट, 25 जून: 'हाच पती जन्मोजन्मी मिळावा' यासाठी वटपोर्णिमा (Vatpurnima) दिवशी प्रार्थना करणाऱ्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्रानं वार (Husband attack on wife) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीनं दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यानं आपल्या पोटच्या मुलीचा कानही कापला (cut daughters ear) आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. संबंधित हल्ला करणाऱ्या पतीचं नाव संभाजी विष्णू पाटोळे असून तो वागदरी येथील रहिवासी आहे. आरोपी पाटोळे काल आपल्या तीन लहान मुली आणि पत्नी पूनम यांना दुचाकीवर घेऊन वागदरीमार्गे अक्कोलकोटकडे येत होता. दरम्यान त्यानं वाटेत दुचाकी थांबवली. येथील एका दर्ग्यामागे नेऊन त्यानं पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या हल्ल्यात पत्नी मदतीसाठी याचना करत होती. मात्र पती तिच्यावर वार करत राहिला. हेही वाचा-लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवले खरे रंग; नवरदेवानं घेतली पोलिसांत धाव आरोपी पती एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं आपल्या पोटच्या मुलीवरही हल्ला केला. त्यानं आपल्या लहान मुलाचा कान कापला आहे. आरोपी पत्नीनं हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आरोपीनं दारुच्या नशेत हे संतापजनक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack, Crime news, Solapur, Wife and husband

    पुढील बातम्या