मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सांगली : घरकुलचा विषय, ग्रामसेविकेचा विनयभंग, ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीचं संतापजनक कृत्य

सांगली : घरकुलचा विषय, ग्रामसेविकेचा विनयभंग, ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीचं संतापजनक कृत्य

संबंधित ग्रामसेविकेने त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ग्रामपंचायत सदस्य महिलेचे पतीचे समाधान झाले नाही.

संबंधित ग्रामसेविकेने त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ग्रामपंचायत सदस्य महिलेचे पतीचे समाधान झाले नाही.

संबंधित ग्रामसेविकेने त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ग्रामपंचायत सदस्य महिलेचे पतीचे समाधान झाले नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India

सांगली, 8 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यानंतर आता सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला ग्रामसेविकेस जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याच्या प्रकार समोर आला आहे. यानंतर जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जत तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा राजेश कोडग यांचे पती राजेश कोडग याने घरकुलाचा प्रस्ताव का जमा केला नाही, अशी विचारणा ग्रामसेविका यांना केली. तसेच खुर्चीवरून उठा, असे म्हणत बदली करून टाकीन अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळही केली. त्यामुळे जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जत तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश साहेबराव कोडग (वय-36) असे आरोपीचे नाव आहे.

1 फेब्रुवारीला पंचायत समिती जत येथे ग्रामसेवक व घरकूल विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक होती. या बैठकीदरम्यान उपसरपंच अमोल माणिक कोडग यांनी ग्रामसेविका यांच्याकडे शीतल धनाजी कोडग यांच्या नावाचा घरकुलाचा प्रस्ताव दिलेला होता. मात्र, या प्रस्तावामध्ये पक्के घर नसल्याचे आणि यापूर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याचा दाखला जोडलेला नव्हता. यामुळे हा प्रस्ताव अपूर्ण होता. याकरिता ग्रामसेविका यांनी त्यादिवशी हा प्रस्ताव घरकूल विभागात सादर केला नव्हता.

या कारणामुळे राहिल्या अनुपस्थित -

कोल्हापूर येथे शासकीय प्रशिक्षण असल्याने ग्रामसेविका या दुसऱ्या दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजास उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. यानंतर मंगळवारी सकाळी त्या ग्रामपंचायतमध्ये सकाळी 10 वाजता कार्यालयीन कामकाज करत होत्या. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास संशयित आरोपी राजेश कोडग याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रवेश केला. आणि तुम्ही शीतल कोडग यांचा घरकुलाचा प्रस्ताव अजून का जमा केला नाही, अशी विचारणा करत होती.

हेही वाचा - धक्कादायक! गरम जेवण मागितलं अन् नवरदेवाच्या भावासोबत घडलं भयानक

यानंतर संबंधित ग्रामसेविकेने त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ग्रामपंचायत सदस्य महिलेचे पतीचे समाधान झाले नाही. तसेच तो ऐकण्याच्या मन:स्थितीतही नव्हता. प्रस्ताव का जमा केला नाही, अशी विचारणा करत बदली करीन, असं म्हणत तो या ग्रामसेविकेला दमदाटी करू लागला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करत त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच यावेळी खुर्चीवरून उठून बाजूला हो अन्यथा बदली करीन, अशी धमकीही त्याने दिली.

याप्रकरणी ग्रामसेविकेने जत पोलिसात राजेश कोडग याच्या विरोधात धमकी दमदाटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989चे सुधारित अधिनियम 2015 च्या कलमानुसार फिर्याद दिली आहे. त्यावरुन जत पोलीस ठाण्यात राजेश साहेबराव कोडग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Sangli, Sangli (City/Town/Village)