जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्यात रिक्षाचालकाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पुण्यात रिक्षाचालकाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पुण्यात रिक्षाचालकाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षाचालकाने (Rickshaw driver) एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. ही घटना बावधन (Bavdhan) परिसरात घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 23 एप्रिल : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षाचालकाने (Rickshaw driver) एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. ही घटना बावधन (Bavdhan) परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? पीडित मुलगी खासगी शिकवणीहून परत येत होती. त्यावेळी ही घटना घडली. ही 12 वर्षीय पीडित मुलगी तिच्या स्टडी रुममधून बाहेर पडली. यानंतर दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास ती बावधन येथील एलएमडी चौकात आली. यानंतर तिथे एका रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आला. यावेळी त्याने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर ती मुलगी घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा -  Sanjay Raut: अमरावतीहून आले राणा, मुंबईत झाला राडा; ट्विट करत संजय राऊतांनी दिला सूचक इशारा पोलीस काय म्हणाले? पीडित मुलगी अल्पवयीन आहे. ती खासगी शिकवणीस जाते. नेहमीप्रमाणे ती एलएमडी चौकात आल्यानंतर तिच्या सोबत हा धक्कादायक प्रकार घडला. एका रिक्षाचालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ येत तिचा विनयभंग केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अज्ञात ऑटो चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (A) आणि 509 आणि लैंगिक अपराधांपासून बालकांना प्रतिबंध करण्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात रिक्षाचालकाने याआधीही… पुण्यातील भारतमाता चौकातील एका सिग्नलवर रिक्षा चालकाने चक्क महिला कर्मचाऱ्यावर विनयभंग केल्याचा भयंकर प्रकार समोर आला होता. या रिक्षाचालकाने आधी महिला अधिकारीला रिक्षात खेचलं आणि तिचा विनयभंग केला. या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणानंतर महिला पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार केली. त्याला अटक करण्यात आली. विश्वदीप भरत मादलापुरे (वय-19), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय-19), सुनिल शिवाजी कसबे (वय-20) असे या आरोपींची नावं आहेत. ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला पोलीस कर्मचाराऱ्याने याबाबत बुधवारी (दि.23) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही घटना घडली तोच आता रिक्षचालकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात