चेन्नई, 8 मे - अमेरिकेतून परतलेल्या वृद्ध जोडप्याच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या दोघांची हत्या त्यांच्याच ड्रायव्हरने त्याच्या मित्रासह केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर दोघांचे मृतदेह नेमेली येथील दाम्पत्याच्या फार्महाऊसवर पुरण्यात आले.
चेन्नई, तामिळनाडूमध्ये पोलिसांनी एका वृद्ध जोडप्याच्या हत्येची उकल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, 60 वर्षीय श्रीकांत आणि त्यांची पत्नी अनुराधा आपल्या मुलीला भेटल्यानंतर अमेरिकेतून भारतात परतले होते. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाम्पत्याचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, या जोडप्याचा कृष्णा नावाचा ड्रायव्हर असून तो मूळचा नेपाळचा आहे. तोच शनिवारी या जोडप्याला घेण्यासाठी विमानतळावर गेला होता. पती-पत्नी दोघेही शेवटच्या क्षणी ड्रायव्हर कृष्णासोबत होते, असं या जोडप्याच्या फोन हिस्ट्रीवरून पोलिसांना कळलं.
हे वाचा - मैत्रीच्या नात्याला काळिमा, अधिकाऱ्याचा मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार
त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याचा चालक कृष्णा आणि त्याच्या एका मित्राला अटक केली. चौकशीत दोघांनी मिळून वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. मैलापूर येथील द्वारका कॉलनीत असलेल्या घरात आरोपींनी पती-पत्नींची हत्या केली होती. यानंतर नेमेली येथील या जोडप्याच्याच मालकीच्या फार्महाऊसमध्ये नेऊन त्यांचे मृतदेह पुरले असल्याचंही या दोघांनी सांगितलं.
हे वाचा - शाळेत न येता फुकटाचा पगार घेत होती मुख्याध्यापिका, 5000 रुपयांत एका मुलीला ठेवलं
फार्महाऊसवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी चेंगलपट्टू येथील सरकारी रुग्णालयात पाठवले. अहवालात असं उघड झालं की, या वृद्ध जोडप्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे. यासोबतच या दोघांनी वृद्ध दाम्पत्याची हत्या का करण्यात आली, याचाही शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Crime news, Murder news