मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मैत्रिणीने केला मैत्रिणीचा घात, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, विरार हादरलं

मैत्रिणीने केला मैत्रिणीचा घात, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, विरार हादरलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मैत्रिणीने मैत्रिणीचा घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  Chetan Patil
विजय देसाई, नालासोपारा, 18 ऑगस्ट : विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मैत्रिणीने मैत्रिणीचा घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच 3 मित्रांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली आहे. तर एक आरोपी परागंदा झाल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी 12 वर्षाची असून ती विरारमध्ये राहते. पीडिता मंगळवारी संध्याकाळी सात वाजता मोबाईल दुरुस्त करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. यावेळी तिची मैत्रीण राणी तिला भेटली. आपण फिरायला जाऊ असे सांगून तिने तिला विरार पूर्वेत एका निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी तिच्या मैत्रिणीचे तीन मित्र हजर होते. या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटना घडली त्यावेळी तिची मैत्रीण घटनास्थळी हजर होती. रात्री दीडच्या सुमारात ही घटना घडली. आरोपींनी मुलीला पहाटे 5 वाजता घरी सोडले. (गुपचूप आले, सावध झाले, संधी मिळताच बाळाला उचलून पळाले, कल्याण रेल्वे स्थानकावर बाळाची चोरी) संबंधित प्रकार पीडित मुलीच्या आईला समजताच बुधवारी संध्याकाळी विरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली. याप्रकरणी विरार पोलिसांनी पीडित मुलीची मैत्रीण राणी तसेच लाला, शुभम सिंग, आणि प्रतीक सिंग या चौघांवर पोक्सो तसेच बलात्कार आणि अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विरार पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार करून 6 तासंच्या आत पीडित मुलीच्या मैत्रिणीसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेले सर्व आरोपी सज्ञान असून वीस ते बावीस वर्ष वयोगटातील आहे. यातील एक आरोपी भाजी विक्रेता आहे. तर एक जण महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. यातील लाला नावाच्या आरोपीवर अमली पदार्थाचा गुन्हा दाखल आहे. तो फरार असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या