नवी दिल्ली 03 ऑगस्ट : देशात बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार तसंच हत्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. अशात आता दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या कँट (Delhi Cantt) परिसरात असलेल्या स्मशानभूमीत (Crematorium Ghat) एका 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पुजाऱ्यासह इतर 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हाच तिचा करंट लागून मृत्यू (Minor Girl Found Dead) झाला.
'कपड्यांप्रमाणे बदलतो बायको'; 6 लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड
घटनेत मृत्यू झालेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार (Rape) झाल्याचा आरोप केला आहे. तर, पोलिसांचं म्हणणं आहे की करंट लागून मुलीचा मृत्यू झाला असावा.
उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं
मुलीचा मृत्यू करंट लागल्यानं झाला की तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी IPC कलम 302, POCSO अधिनियम, 506, 342, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, याआधीच पुजाऱ्यासह 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर येताच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news, Rape