• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं; 25 वर्षं सुरू होता कमिशनचा उद्योग

उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं; 25 वर्षं सुरू होता कमिशनचा उद्योग

आपले रखडलेले बिलाचे पैसे मागणाऱ्या कंत्राटदाराला (Contractor) लाच मागणारा अधिकारी (Officer) आणि त्याला साथ देणारी क्लार्क (Clerk) या दोघांना लोकायुक्तांनी (Lokayukta) अटक केली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 2 ऑगस्ट : आपले रखडलेले बिलाचे पैसे मागणाऱ्या कंत्राटदाराला (Contractor) लाच मागणारा अधिकारी (Officer) आणि त्याला साथ देणारी क्लार्क (Clerk) या दोघांना लोकायुक्तांनी (Lokayukta) अटक केली आहे. साडेनऊ लाख रुपयांचं (9.5 lakh) बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यानं कंत्राटदाराकडं 3 टक्के लाच (Bribe) मागितली होती. याची तक्रार कंत्राटदारां लोकायुक्तांकडे केल्यानंतर सापळा रचून या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. अशी घडली घटना मध्यप्रदेशातील इंदूर नगरपालिकेत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर धीरेंद्र चौबे यांचे अनेक दिवसांपासून 9 लाख रुपये प्रलंबित होते. हे बिल मिळण्यासाठी त्यांनी पालिकेकडं अर्ज केला. त्यावेळी हे बिल मंजूर करण्यासाठी 3 टक्के लाच देण्याची मागणी जनसंपर्क विभागाचे अधीक्षक विजय सक्सेना यांनी मागितली. चौबे यांनी या प्रकाराची लोकायुक्तांकडे तक्रार केली. असा रचला सापळा चौबे हे त्यांच्या बॅगेतून 25 हजार रुपये नगरपालिका कार्यालयात गेले. सक्सेना यांच्याकडे ते बॅग देत असताना त्यांनी स्वतः स्विकारायला नकार दिला. त्यांच्या सहकारी असणाऱ्या क्लार्क हिमानी वैद्य यांच्याकडे ती बॅग देण्याची सूचना सक्सेनांनी केली. चौबे यांनी ती बॅग हिमानी यांच्याकडं दिली. मग हिमानी यांनी ती बॅग सक्सेना यांच्या कपाटात नेऊन ठेवली. त्याच वेळी पोलिसांनी तिथं धाड टाकली आणि दोघांना अटक केली. हे वाचा -अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 25 वर्षांचा अनुभव यातील मुख्य आरोपी विजय सक्सेना हे गेल्या 25 वर्षांपासून नगरपालिकेत काम करतात. यापूर्वी वेगवेगळ्या विभागात काम करताना त्यांनी अनेकांकडून लाच घेतली असल्याची चर्चा आहे. मात्र छोटीमोठी रक्कम देऊन कामे होत असल्यामुळे आतापर्यंत कुणी तक्रार दाखल केली नव्हती. यावेळी मात्र कंत्राटदाराने तक्रार केल्यामुळे सक्सेना आणि त्यांच्या सहकारी हिमानी वैद्य यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
  Published by:desk news
  First published: