नाशिक, 12 ऑगस्ट : नाशिक (Nashik Crime News) जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर (Dr. Vaishali Zankar-Vir) या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून याचा मोठा फटका वैशाली झनकर यांना सहन करावा लागणार आहे. अद्याप त्या गायब असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्या फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. ( Nashik Zilla Parishads corrupt education officer escaped )
वैशाली झनकर वीर यांच्या कृत्यामुळे सरकारची प्रतिमा मलील झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वैशाली वीर यांचं सरकारडून निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे निलंबन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना आदेश दिले आहेत.
हे ही वाचा-लाचखोरी प्रकरणी शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात;लाच घेताना चालकाला रंगेहाथ अटक
झनकरांची लाखोंची संपत्ती
बुधवारी नाशिकमध्ये (Nashik) 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली होती. झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik