जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / अल्पवयीने मुलाने स्वतःच्याच 12 वर्षीय भावाचं केलं अपहरण; शेवटी पैसे न मिळाल्याने उचललं भयानक पाऊल

अल्पवयीने मुलाने स्वतःच्याच 12 वर्षीय भावाचं केलं अपहरण; शेवटी पैसे न मिळाल्याने उचललं भयानक पाऊल

फाईल फोटो

फाईल फोटो

15 वर्षांच्या मुलाने सहा लाख रुपयांसाठी आपल्याच 12 वर्षांच्या चुलत भावाचं अपहरण केलं. त्यानंतर ती रक्कम न मिळाल्याने त्याने दोन जणांसह मिळून चुलत भावाची हत्या केली.

  • -MIN READ Jharkhand
  • Last Updated :

रांची 06 मार्च : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे 15 वर्षांच्या मुलाने सहा लाख रुपयांसाठी आपल्याच 12 वर्षांच्या चुलत भावाचं अपहरण केलं. त्यानंतर ती रक्कम न मिळाल्याने त्याने दोन जणांसह मिळून चुलत भावाची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह दगडांनी बनवलेल्या गुहेत टाकण्यात आला. जानेवारीत ओळख, नंतर प्रेम अन् लग्नाचे आमिष देत प्रेयसीसोबत भयानक कृत्य एका वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी कोल्हुवा कुडार येथील दुलकी नदीच्या दगडी गुहेतून मृतदेह बाहेर काढला आणि हजारीबाग येथील सदर रुग्णालयात पाठवला. तर दुसरीकडे मुलाचा मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबीय रडून आक्रोश करत आहेत. आपल्या मुलाचा खून करणारा दुसरा कोणी नसून त्याचाच चुलत भाऊ आहे, यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही. पैशाच्या लोभापायी एक भाऊ इतका आंधळा झाला, की त्याने आधी इतर आरोपींसोबत भावाचं अपहरण केलं. यानंतर त्यानं आपल्याच कुटुंबीयांना फोन करून 6 लाख रुपयांची मागणी केली. पैसे मिळाले नाहीत आणि हे प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने आरोपींनी अल्पवयीन मुलाची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह दगडांच्या मधोमध बांधलेल्या गुहेत लपवून ठेवला. 13 वर्षाच्या मुलासोबत शारिरीक संबंध, 31 वर्षांची महिला गर्भवती, पण, तुरुंगवास नाही होणार आरोपी चुलत भाऊ यादरम्यान आपली ओळख लपवून अपहरण केलेल्या मुलाच्या पालकांकडे 6 लाख रुपयांची मागणी करत होता आणि या काळातही तो कुटुंबासोबतच राहत होता. या प्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला आणि गुन्हेगाराचं नाव ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र या सगळ्यात 12 वर्षीय मुलाला विनाकारण आपला जीव गमवावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात