पुणे 30 सप्टेंबर : आपले हट्ट पूर्ण न झाल्याने अनेकदा मुलं टोकाचं पाऊल उचलतात. याबाबतच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना आता बारामतीमधून समोर आली आहे. या घटनेत आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बारामती तालुक्यातील क-हावागज गावात घडली आहे. होमवर्क केला नाही म्हणून 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; शाळेबाहेर आढळला मृतावस्थेत शुभम मोतीराम धोत्रे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे वडिलांचं आधीच निधन झालं आहे. त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. शुभम मागील काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करत होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. याच कारणामुळे निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत. ‘कसा बाप झाला वैरी’, हा पिता नाही तर खुनी, पोटच्या लेकीची हत्या, पुणे हादरलं या मुलाने पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. अवघ्या चौदा वर्षाच्या शुभमने मोबाईलसाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.