मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

PUBG हत्याकांड : गोळ्या झाडल्यावरही 10 तास जिवंत होती आई; आरोपी मुलगा तिला तडफडताना बघत राहिला

PUBG हत्याकांड : गोळ्या झाडल्यावरही 10 तास जिवंत होती आई; आरोपी मुलगा तिला तडफडताना बघत राहिला

तो दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला.

तो दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला.

तो दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला.

    लखनऊ 10 जून : किशोरवयातील मुलं जास्त घातक असतात, असं म्हटलं जातं. या वयातील मुलांचा स्वत:च्या मनावर आणि रागावर (Anger) अजिबात ताबा राहत नाही. लखनऊमध्ये नुकत्याच घडलेल्या एका भीषण घटनेनंतर, ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लखनऊमधील (Lucknow) एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेम (PUBG Game) खेळू देत नाही म्हणून रागाच्या भरात स्वत:च्या आईची (Mother) बंदुकीची गोळी झाडून हत्या (Murder) केली. गोळी मारल्यानंतर जवळपास 10 तास तडफडणाऱ्या आईची मदत करण्याचा विचार एकदाही त्याच्या डोक्यात आला नाही. शनिवारी, 4 जून 22 रोजी ही घटना घडली. सर्वांत भयानक म्हणजे मुलाने मंगळवारी (७ जून) रात्री, बाहेरगावी असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचं सांगितलं होतं. शिवाय, वडिलांना मृतदेहही दाखवला होता. दैनिक भास्करने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. होमवर्क केला नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत आईने केलं 'हे' धक्कादायक कृत्य लखनऊमधील पबजी हत्याकांडातील (PUBG Murder Case) आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने आईची रात्री दोन वाजता गोळ्या घालून हत्या (Shot Dead) केल्याची कबुली दिली. 'आपली आई दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जिवंत होती. या कालावधीमध्ये आपण आठवेळा खोलीचे दार उघडून ती जिंवत आहे की मेली याची खात्री केली होती,' असंही या मुलाने कबुल केलं आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP), कासीम अब्दी यांनी सांगितलं की, "मृत साधनासिंग यांची हत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्याने सांगितलं की, शनिवारी 4 जून रोजी रात्री तो आई आणि बहिणीबरोबर एकाच खोलीत झोपला होता. हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुलदेखील (Pistol) त्याच खोलीच्या कपाटात ठेवलेलं होतं. आईच्या उशीखालची चावी काढून त्याने दोन वाजण्याच्या सुमारास कपाटातून पिस्तुल घेतलं. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. हात थरथर कापत असतानाही त्याने बंदुकीमध्ये गोळ्या भरल्या होत्या." हाताचा थरकाप झाल्याने तीन गोळ्या जमिनीवर पडल्या. तरीही तो पिस्तुल घेऊन आईकडे गेला. त्याची 10 वर्षांची बहीणही आईसोबत पलंगाच्या उजव्या बाजूला झोपली होती. जोरात गोळी झाडल्यास पलीकडे झोपलेल्या बहिणीला गोळी लागू शकते, अशी कल्पना त्याच्या मनात होती. त्यामुळे बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने त्याने गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली. पण त्याने तिचे तोंड दाबून तिला स्वत:च्या दिशेने ओढले. गोळी झाडताच आईच्या डोक्यातून रक्ताचा फवारा वाहू लागला होता. यानंतर तो बहिणीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला आणि आईच्या खोलीचा दरवाजा बंद केला. आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं की, गोळी झाडल्यानंतर आई पलंगावरच तडफड करू लागली. तिला त्या अवस्थेत सोडून तो बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. त्याला आईला दुसरी गोळी मारायची नव्हती. त्यामुळे तो आहे त्याच स्थितीत आईच्या मृत्युची (Death) वाट बघू लागला. तो दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला. गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम एडीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, साधना यांच्या घरापासून पीजीआय हॉस्पिटलचं (PGI Hospital) अंतर केवळ दोन किलोमीटर इतकं आहे. गोळी लागल्यानंतर त्यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पोलिसांना वेळीच माहिती मिळाली असती तर फार चांगलं झालं असतं, असंही एडीसीपी म्हणाले. आईची हत्या केल्यानंतर मुलाने तीन दिवस मृतदेह (Dead body) घरातच ठेवला होता. पोलिसांनी सांगितलं की, 5 जून रोजी सकाळी बहिणीला खोलीत बंद करून तो आईची स्कुटी घेऊन बाहेर गेला होता. त्यानंतर संध्याकाळी मित्राला घरी बोलवून आणि बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद करून मित्रासोबत पार्टी केली. मित्राने आईबाबत विचारलं असता ती आजीकडे गेल्याची थाप त्याने मारली होती. 6 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बहिणीने भूक लागल्याचं सांगितलं. यावर तो शेजाऱ्यांच्या घरी गेला. आई आजीच्या घरी गेली आहे, मला स्वयंपाक कसा करायचा ते कळत नाही. बहिणीला भूक लागली आहे, असं सांगून शेजाऱ्यांकडून तिच्यासाठी जेवण आणलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दुसऱ्या एका मित्राला फोन केला आणि पार्टी केली. मंगळवार, 7 जून रोजी सायंकाळपर्यंत घरात दुर्गंधी (Stink) पसरली. त्यामुळे आता ही घटना लपवणं अवघड आहे असं त्याला वाटलं. म्हणून त्याने सायंकाळी सातच्या सुमारास वडील नवीन यांना फोन करून हत्येची माहिती दिली. वाराणसीचे रहिवासी असलेले नवीन कुमार सिंह हे लष्करात कनिष्ठ अधिकारी (Junior Commission Officer) आहेत. सध्या त्यांचं पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. लखनऊच्या पीजीआय भागातील यमुनापुरम कॉलनीत त्यांचं घर आहे. त्यांची पत्नी साधना (40 वर्षे) 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी या घरात राहत होते. या प्रकरणी नवीनची आई नीरजा देवी यांनी नातवाविरुद्ध सुनेच्या हत्येबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला बाल सुधारगृहात (Juvenile Correctional Institution) पाठवण्यात आलं आहे. मुलाचे वडील नवीन यांनी रडत सांगितलं, "आपल्या मुलाने आनंदी जीवन जगावं असं प्रत्येक पित्याला वाटतं; पण आता माझ्या मुलाने आयुष्यभर तुरुंगात राहावं असं मला वाटतं. त्याला त्याच्या गुन्ह्याची पूर्ण शिक्षा मिळावी. त्यासाठी मी स्वत: सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे." 10 वर्षांच्या मुलीने सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहणार आहे. ती या मानसिक आघातातून बाहेर यावी यासाठी मी तिला स्वत:जवळ ठेवेन, असंही नवीन कुमार म्हणाले.
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या