नवी दिल्ली, 8 जून : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. यात दिल्लीतील एका पाच वर्षाच्या मुलगी तडपत्या उन्हात छतावर पडली आहे. तसेच तिचे हातपाय बांधले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना खजुरी खास (Khajuri Khas) परिसरात 2 जूनला घडली आहे. आईने मुलीसोबत केलेल्या असभ्य वर्तनावर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) जेजे कायद्यांतर्गत (JJ Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलगी होमवर्क करत नसल्याने तिच्या आईने तिचे हातपाय बांधून तिला गच्चीवर सोडले. मुलीच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाईही सुरू करण्यात आली आहे. शेजारच्या महिलेने बनवला व्हिडिओ - दिल्ली पोलिसांनी याबाबत ट्विट केले की, ”हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याची ओळख शोधली. मुलीच्या कुटुंबीयांची ओळख पटली असून योग्य ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.” शेजारच्या घरातून शूट केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी मदतीसाठी ओरडताना ऐकू येते. तीही स्वत:ला खोलण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. या घटनेचा व्हिडिओ शेजारच्या महिलेने बनवला आहे. 25 सेकंदाचा व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेने दावा केला आहे की, मुलीच्या आईने तिचे हात-पाय बांधले आणि दुपारी 2 वाजता कडक उन्हात तिला टेरेसवर सोडले. पोलिसांनी खजुरी खास परिसरातील इमारतीची ओळख पटवून मुलीच्या कुटुंबाचा शोध घेतला. चौकशी सुरू असून कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हेही वाचा - क्लासवरुन घरी येत असताना पुन्हा त्याने काढली छेड, काही तासांतच मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल सिंग या यूजरने लिहिले की, “हे भयानक आहे. कृपया याकडे ताबडतोब लक्ष द्या.” आनंद वर्मा नावाच्या युजरने लिहिले की, “कृपया या प्रकरणात त्वरित लक्ष द्या.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.