Home /News /crime /

एकतर्फी प्रेमातून गाठला क्रूरतेचा कळस; अपहरण करत महिलेच्या हातावर लिहिला धक्कादायक मेसेज

एकतर्फी प्रेमातून गाठला क्रूरतेचा कळस; अपहरण करत महिलेच्या हातावर लिहिला धक्कादायक मेसेज

पोलिसांनी सांगितलं, की महिलेनं आपल्या मैत्रिणीला मेसेज करून सांगितलं की माझा जीव धोक्यात आहे. माझं अपहरण झालं आहे.

    वॉशिंग्टन 04 जानेवारी : एका अरबपती व्यक्तीने एकतर्फी प्रेमात (One-Sided Love) एका महिलेलाच किडनॅप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून आधी महिलेचं अपहरण केलं (Millionaire Kidnapped a Woman in One Sided Love), यानंतर अनेक आठवडे तिचा छळ केला. मात्र, महिलेच्या हुशारीमुळे तिचा जीव वाचला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, यूएसच्या उटाहमध्ये राहणाऱ्या अरबपतीने महिलेचं यासाठी अपहरण केलं, कारण तो तिच्यावर प्रेम करत होता. मात्र, महिलेला तो आवडत नव्हता. महिलेचं अपहरण केल्यानंतर त्याने तिला भरपूर मारलं आणि टॉर्चर केलं. 39 वर्षीय आरोपी रमोन मार्सियो मार्टिनेज याने महिलेच्या हातावर धारदार शस्त्राने 6 आकडा लिहिला. याचा अर्थ असा होता, की तिला सहा महिन्याचा वेळ दिला जात आहे. या काळात महिलेला या व्यक्तीचं प्रपोजल किंवा आपला मृत्यू यातील एक गोष्ट निवडायची होती. अल्पवयीन मुलांकडून सिनेस्टाईल खून; दुकानात लपलेल्या तरुणाला रस्त्यावर आणून ठेचलं पोलिसांनी सध्या या आरोपीला महिलेचं अपहरण आणि तिच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेचं नाव उघड केलेलं नाही. मात्र, हे सांगितलं की महिलेच्या हुशारीमुळे तिचे प्राण वाचले. महिलेनं संधी मिळताच आपल्या एका मैत्रिणीला मेसेज केला होता की तिचं अपहरण झालं आहे. महिलेच्या मैत्रिणीनं याबाबत पोलिसांनी माहिती दिली आणि तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, की महिलेनं आपल्या मैत्रिणीला मेसेज करून सांगितलं की माझा जीव धोक्यात आहे. माझं अपहरण झालं आहे. कृपया माझी मदत करा. तक्रार मिळताच पोलीस लगेचच आरोपीच्या घरी पोहोचले. आरोपीनं जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या हातात बंदूक होती. अधिकाऱ्यांनी लगेचच त्याला अटक केली. आरोपीच्या घरातच पीडित महिला सापडली, तिची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. तिला भरपूर मारहाण करण्यात आलेली होती. महिलेला श्वास घ्यायालाही त्रास होत होता. मरणानंतर एकत्र झालेच; कपलने Whatsapp स्टेटस ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End महिलेनं पोलिसांना सांगितलं की आरोपी तिच्यावर चाकूने वार करत असे. बेल्टने तिला मारहाण करत असे आणि कधीकधी बंदूक हातात घेऊन तिला घाबरवतही असे. त्याने महिलेच्या चेहऱ्यावरही अनेकदा हल्ला केला होता, यामुळे तिचा चेहराही खराब झाला होता. त्याने महिलेला सहा महिन्यांची वेळ दिला होती. यात जर तिने त्याचं प्रपोजल स्वीकारलं नाही तर आरोपी तिची हत्या करणार होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Kidnapping, Love story

    पुढील बातम्या