उदयपूर, 10 एप्रिल: एका विवाहित महिलेनं आपल्या दीरासोबतच्या असलेल्या अनैतिक संबंधातून (Immoral Relation) पतीची निर्घृण हत्या (Husband's murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या पतीचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा बनाव रचला आहे. पण तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही. कारण पतिच्या हत्येनंतर त्याचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना तिचा चलाखी पकडली गेली आहे. यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नीला आणि मोठ्या भावासहित सात जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
उदयपूरचे (Udaipur) पोलीस अधीक्षक राजीव पचार यांनी शुक्रवारी सांगितलं की, संबंधित मृत व्यक्तीचं नाव उत्तम दास असून तो त्रिपुरा येथील रहिवासी आहे. पत्नी आणि मोठ्या भावाने सुपारी देऊन त्याची हत्या केली होती. मृत्यूच्या पाच महिन्यानंतर पोलिसांना या हत्येचं गुढ उलगडण्यात यश आलं आहे. संबंधित घटना ही राजस्थानातील उदयपूर येथील आहे.
आरोपी पत्नी रुपाचे गेल्या काही दिवसापासून मृत पती उत्तम दासच्या मोठ्या भावासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे दोघांनी उत्तम दासच्या हत्येची कट रचला. अवैध संबंधात बाधा ठरणाऱ्या उत्तम दासला संपवण्यासाठी आरोपींनी उदयपूरच्या राकेश लुहारला 12 लाख 40 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर आरोपींनी मृत उत्तमला गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी बहाणा बनवून उदयपूर याठिकाणी घेऊन गेले. याठिकाणी उत्तमला गुंगीचं ओषध पाजून त्यानंतर गळा आवळून हत्या केली.
(हे वाचा- हाय प्रोफाइल मुलींना फसवत मेकॅनिकल इंजिनिअर बनला SEX रॅकेटचा सूत्रधार)
पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, आरोपी रूपा आणि तपन गेल्या काही दिवसांपासून उत्तमचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा पंचायतीमध्ये फेऱ्या मारत होते. दरम्यान उदयपूर स्पेशल पोलीस टीमला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आणि घटनेचा छडा लावला. पोलीस अधिकारी प्रल्हाद यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही आरोपी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपडत होते. मृत उत्तम दास यांच्या नावावरील एलआयसी विमा हडपण्याचा त्यांचा बेत होता. त्याचबरोबर ती खोटा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी उदयपूरच्या काही सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात होती. पोलिसांनी त्यांचं बिंग फोडलं असून त्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder Mystery, Rajasthan