जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हाय प्रोफाइल मुलींना फसवत मेकॅनिकल इंजिनिअर बनला SEX रॅकेटचा सूत्रधार, 4 जणींची सुटका

हाय प्रोफाइल मुलींना फसवत मेकॅनिकल इंजिनिअर बनला SEX रॅकेटचा सूत्रधार, 4 जणींची सुटका

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

वसईत एका सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्यआरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नालासोपारा, 9 एप्रिल : वसईमध्ये किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर (Mechanical engineer) आणि त्याच्या मैत्रिणीला अ‍ॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी 4 हाय प्रोफाईल पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. वसई येथील नवघर माणिकपूर एसटी बस डेपो जवळ एक महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींना घेवून येणार असल्याची माहिती अ‍ॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांना मिळाली होती. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिल्या नंतर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते, अतिरक्त आयुक्त एस जयकुमार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.महेश पाटील, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक भास्कर पुकळे यांनी सहाय्यक फौजदार प्रकाश निकम, पोलीस नाईक विशाल कांबळे, शाम शिंदे, साक्षी डोईफोडे, काजल पाटील यांनी सापळा रचून एका महिलेला अटक करून 4 पीडित मुलींची सुटका केली. या प्रकरणात मुख्यआरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दलाल जिया सावदेकर आणि सुरज उर्फ संदीप पाल याची किंडर अ‍ॅप वरून ओळख झाली दोघांची मैत्री झाली तिला मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे तुला चांगल्या पगाराची नोकरी देतो तुला सेल्समनचे काम करावे लागेल असे सांगितले. दोघांनी एकत्र फोटो काढले होते. काही दिवसांनी तुला भरपूर पैसा मिळेल ग्राहकाकडे जावून त्याला खुश करायचे असे जियाला सांगितल्यावर तिने याला नकार दिला. त्यानंतर तिला तुझे एडीट केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून जियाला वेश्या व्यवसायात आणून तिला तिच्या मैत्रिणीला या व्यवसायात आणले. हे पण पाहा : धक्कादायक! भर मुंबईत चालू रिक्षात अत्याचाराचा प्रयत्न, स्वरक्षणासाठी धावत्या रिक्षातून उडी मारल्याने महिला जखमी आरोपी संदीप पाल हा OLX  वर नोकरी शोधणाऱ्या सुशिक्षित मुलींना पर्सनल सेक्रेटरी ची नोकरी मिळेल असे सांगून त्यांच्या कडून त्यांचे फोटो मागवून घ्यायचा महिन्याला 30 ते 50 हजार आणि इतर सुविधा मिळतील असे सांगून आपल्या जाळ्यात ओढायचा. त्या मुली आल्या नंतर त्यांना तुम्हाला फिल्डवर्क करून ग्राहकांना सर्व्हिस द्यायची असे सांगायचा. ज्या मुलींना हे आवडल नाही तर त्या मुली त्याला ब्लॉक करायच्या मग अशा मुलींना तो दुसऱ्या नंबर वरून संपर्क साधून तुमचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत असे मग नाईलाजाने त्या मुली वेश्या व्यवसायात अडकत गेल्या. किंडर अ‍ॅपवरून ग्राहकांशी संपर्क करून तो त्या मुलींना ग्राहकांकडे पाठवायचा. त्या गुरुवारी वसईला येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांनी एका सामाजिक संस्थेच्या रवींद्र सिह यांनी जियाला फोन करून मुलींची मागणी केली. तिने वसई पश्चिमेकडील एसटी बस डेपो जवळ बोलावले. जिया आणि 4 पीडित मुली दोन रिक्षात बसून आल्या. त्यानंतर रवींद्र जियाकडे गेला असता तिने 4 पीडित मुली दाखवल्या त्यातील एक मुलगी पसंत करून तिला 2000 रुपये दिले. यावेळी अ‍ॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने 4 पीडित आणि जियाला ताब्यात घेतले त्यानंतर नालासोपारा येथील अनैतिक वाहतूक शाखेत आणून चौकशी केली असता तिने तिच्या म्होरक्या विषयी माहिती दिली. दलाल संदीप नालासोपारा रेल्वे स्टेशनला कमिशन घेण्यासाठी आला असता सामजिक संस्थेच्या सहाय्याने पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. विशेष बाब म्हणजे पीडित अशिक्षित किंवा गरीब नसून हायप्रोफाईल वस्तीतल्या आहेत. एम कॉम, ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण झाले असून झटपट पैशाच्या लालसे पोटी हायप्रोफाईल मुली अशा दलालंचे सावज बनत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान नोकरीसाठी कोणत्याही सोशल साईडवर ,डेटिंग अ‍ॅपवर कोणत्याही मुलींनी आपले पर्सनल डिटेल्स, फोटो अपलोड करू नका. समोरचा व्यक्ती कोण आहे हे तपासून पाहावे ओळखी शिवाय अनोळखी व्यक्तींना आपल्या पर्सनल डिटेल शेअर करू नये आणि बळी पडू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात