मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /4 वर्षांपासून हुंड्यासाठी मागत होते बुलेट, अचानक 2 लेकरांसह पत्नी झाली गायब, असं काय घडलं?

4 वर्षांपासून हुंड्यासाठी मागत होते बुलेट, अचानक 2 लेकरांसह पत्नी झाली गायब, असं काय घडलं?

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मशरक पोलीस स्टेशन परिसरात एक विवाहित महिला दोन मुलांसह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मशरक पोलीस स्टेशन परिसरात एक विवाहित महिला दोन मुलांसह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मशरक पोलीस स्टेशन परिसरात एक विवाहित महिला दोन मुलांसह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

संतोष कुमार (छपरा), 08 मार्च : बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मशरक पोलीस स्टेशन परिसरात एक विवाहित महिला दोन मुलांसह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय महिलेच्या पालकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर महिलेच्या सासरचे लोकच बेपत्ता आहेत. तर सर्वांचे मोबाईलही बंद आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही घटना बिहारमधील छपराच्या मशरक पोलीस स्टेशन हद्दीतील सिक्टी देवन गोधना गावातील आहे. या घटनेत विवाहित महिलेसह दोन मुलांचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर आहे. दुसरीकडे पोलिसांनी गावात पोहोचून पोलीस अधिकारी रविशंकर पांडे यांच्या उपस्थितीत बंद घराचे कुलूप उघडून झडती घेतली. विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या अर्जावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

होळी साजरी करून तो नदीत उतरला पण पोलिसांना थेट मृतदेहच मिळाला, अभियंत्यासोबत पुण्यात धक्कादायक घटना

एफआयआर नोंदवताना, मशरक पोलीस स्टेशन परिसरातील पदमपूर गावातील रहिवासी पंचानंद सिंग यांनी सांगितले की, त्यांची भाची पूजा कुमारी हिचे लग्न 2018 मध्ये सिक्टी देवन गोधना गावातील रहिवासी शंभूनाथ सिंह यांच्याशी झाले होते. यानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी बुलेट बाईकसाठी छळ सुरू केला होता. एवढेच नाही तर त्यांच्यात अनेकवेळा मारामारीही व्हायची.

या संदर्भात त्यांनी अनेक पंचायती ठेवून मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच भाचीने फोन करून लहान मुलाचे पाय जाळल्याचीही आमच्याकडे तक्रार दिली होती. गावी पोहोचल्यावर घराचा दरवाजा बंद दिसला. या दरम्यान कुटुंबातील सर्व सदस्य बेपत्ता असल्याचे आढळून आले. सर्वांचे मोबाईल बंद आहेत. पंचानंद सिंग यांचा आरोप आहे की, सासरच्यांनी त्यांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.

रात्री प्रेयसीला भेटायला गेला पण घडलं भलतच; प्रियकराचा भयानक मृत्यू, घटना समोर येताच पोलीसही चक्रावले!

नातेवाईकांनी सांगितले की, सासरचे लोक पूजाला अनेकदा त्रास देत असत. तसेच पूजाचा पती दीपक कुमार सिंगसह अर्धा डझन लोकांनी तिची आणि तिच्या दोन मुलांची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचा आरोप आहे. यापूर्वी बुलेट बाईक न दिल्याने गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या लोकांना देण्यात आली होती. माश्रक पोलीस स्टेशन तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Patna