मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /27 वर्षे लहान महिलेसोबत लग्न, शरीरसंबंधादरम्यान रक्त येईपर्यंत चावायचा; कोर्टाने जप्त केली कवळी

27 वर्षे लहान महिलेसोबत लग्न, शरीरसंबंधादरम्यान रक्त येईपर्यंत चावायचा; कोर्टाने जप्त केली कवळी

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

ही पीडित महिला 67 वर्षीय व्यक्तीपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. तिने दाखवलेले पुरावे पाहून कोर्टही हादरलं!

इंदूर, 6 जानेवारी : एमपीमधील (Madhya Pradesh Today News) इंदूरमध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिचा पती अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध (Unnatural Sex) ठेवत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. यादरम्यान तो पत्नीच्या शरीरभर दाताने चावा घेत होता. सोबतच प्रायव्हेट पार्टवरही दातांचे व्रण दिसत होते. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर पती सातत्याने अशी वागणूक देत होता.

महिलेचं लग्न गुजरातमधील 67 वर्षीय जुलरसोबत झालं होतं. ती इंदूरमध्ये राहणारी आहे. लग्नानंतर महिला गुजरातला गेली होती. पतीपेक्षा ती 27 वर्षांनी लहान होती. महिलेचं हे दुसरं लग्न होतं. महिलेने सांगितलं की, यानंतर पती तिला उदयपूरला घेऊन गेला होता. येथेदेखील तो तिच्यासोबत असंच कृत्य करीत होता. पतीच्या तोंडात दात नव्हते. त्याने दातांची कवळी बसवली होती.

पत्नी याला विरोध करीत होता. मात्र जुलर तिला धमकी देत होता. जुलर म्हणायचा की, माझ्याजवळ खूप पैसे आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या लोकांशी संपर्क आहे. महिला कसंबसं करून डिसेंबरच्या सुरुवातीला तेथून निघून गेली. यानंतर इंदूरमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने सांगितलं की, जुलरसह 28 ऑक्टोबरला लग्न झालं होतं. लग्नानंतर पती शरीरसंबंधाच्या वेळी क्रूरपणे वागणूक देत होता.

हे ही वाचा-भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

जुलर आपल्या पत्नीला धमकी देत होता. जर तुम्ही ऐकलं नाही तर गुजरातमध्ये बसून इंदूरमधील तुझं कुटुंब संपवून टाकेन. यामुळे महिला घाबरली होती. पत्नीने डिसेंबरमध्ये पतीविरोधात अनैसर्गिक सेक्स रिलेशन ठेवण्याचा गुन्हा दाखल केला होता. पत्नीचा आरोप आहे की, शरीर संबंध ठेवताना पती तिला चावत होता. या प्रकरणात पुरावा म्हणून महिलेच्या वकिलाने कोर्टात जखमेचे फोटो शेअर केले होते. यानंतर कोर्टाने महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत तातडीने कारवाई केली. सोबत पोलिसांना आरोपीची दातांची कवळी जप्त करण्याचे आदेश दिले.

पीडितेने सांगितलं की, जूलरच्या पहिल्या पत्नीचं कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. त्या आधीपासूनच ती पतीपासून वेगळं राहत होती. एका नातेवाईकांकडून हे मागणं आलं होतं. ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.

First published:

Tags: Crime news, Indore News, Madhya pradesh, Marriage, Women harasment