Home /News /national /

भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

नशेचं औषध देऊन बलात्कार आणि ब्लॅक मेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

    कानपुर, 6 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमध्ये (Kanpur News)  एका महिला भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ शूट करून तिच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही पीडिता भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. महिला नेत्याने आपल्याच एका नातेवाईकावर हा धक्कादायक आरोप केला आहे. नशेचं औषध देऊन बलात्कार आणि ब्लॅक मेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. महिला भाजप नेत्याने आपल्या तक्रारीत लिहिलं आहे की, केशवपुरममध्ये राहणारा त्यांचा लांबच्या नातेवाईकाचं घरी येणं-जाणँ असतं. काही दिवसांपूर्वी त्या कानपूरमध्ये एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. अचानक डोकं दुखी लागल्याने नातेवाईक जवळच्या हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी घेऊन गेला. येथे डोकेदुखीचं औषध देत असल्याचं सांगून नशेचं औषध दिलं. महिला बेशुद्ध झाल्यानंतर नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला. हे ही वाचा-प्रचारसभेत बाईकवर उभं राहून स्टंटबाजी, बॅलन्स गेल्याने झाला पोपट; पाहा VIDEO महिलेने आरोप केला आहे की, नातेवाईकाने त्याचा अश्लील व्हिडीओ शूट केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. तेव्हा तिला शंका आली. भाजप महिला नेत्याने आरोप केला आहे की, नातेवाईकाने त्याला पुन्हा फोन करण्याची ताकीद दिली. काही दिवसांनंतर आरोपी तिच्याकडून पैशांची मागणी करू लागला. विरोध केल्यांतर नातेवाईकाने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. बदनामी होऊ नये यासाठी महिलेने नातेवाईकाला तब्बल अडीच लाख रुपये दिले. याशिवाय आरोपी भाजप महिला नेत्याच्या मुलीवर हल्ला करण्याची धमकी दिली. ज्यानंतर पीडितेने पोलिसात याबाबत तक्रार केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Uttar pradesh

    पुढील बातम्या