मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'मी वाईट माणूस नाही, पण परिस्थिती....' कर्ज फेडता न आल्याने मुले, पत्नीची हत्या करुन वडिलांनी संपवलं जीवन

'मी वाईट माणूस नाही, पण परिस्थिती....' कर्ज फेडता न आल्याने मुले, पत्नीची हत्या करुन वडिलांनी संपवलं जीवन

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी असलेले अमित यादव हे आपल्या कुटुंबासोबत इंदूरमध्ये राहत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Indore, India
  • Published by:  News18 Desk

इंदूर, 24 ऑगस्ट : ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जामुळे आलेल्या तणावातून एकाने आपल्या परिवाराची हत्या करुन नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अमित यादव असे आरोपी मृताचे नाव आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. अमित यादवने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असलेले अमित यादव हे आपल्या कुटुंबासोबत इंदूरमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी अमितने घरच्यांचा फोन उचलला नाही. यानतंर भगीरथपुरा येथे राहणाऱ्या त्यांच्या सासरच्यांना कळवण्यात आले. यानंतर सासू-सासरे व कुटुंबीय भाड्याने खोलीवर पोहोचले. मात्र, तिथे कोणीही दरवाजा उघडत नव्हते.

अशा स्थितीत बाणगंगा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, अमित यादवचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच शेजारीच दोन्ही मुले आणि पत्नी बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यांची नाडी तपासली असता ते मृत्यू झाला होता. अमितने आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी अमितने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, ज्यामध्ये लिहिलं होतं- 'माणूस वाईट नसतो, पण परिस्थितीने असं केलंय...' 'मलाही जगण्याची इच्छाशक्ती आहे, पण माझी परिस्थिती आता अशी नाही, यार मी वाईट नाही, पण परिस्थिती तशी नाही... मी अनेक ऑनलाइन अॅप्सवरून कर्ज घेतले आहे, पण मला कर्ज फेडता येत नाही, अपमानाच्या भीतीने मी हे पाऊल उचलत आहे, पोलिसांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नये, यासाठी मी एकटाच दोषी आहे.

हेही वाचा - IT इंजीनिअर तरुणीचे ब्रेकअप, प्रियकराशी संपर्क साधायला घेतली चक्क मांत्रिकाची मदत, 9 लाखांचा गंडा

याप्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना घडली आहे, ऑनलाइन अॅपवरून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेची चौकशी केली जाईल, काही आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले आहेत.

First published:

Tags: Indore, Murder, Suicide