मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गुंडाराज! तरुणाने मागितलं सलमानच्या सिनेमाचं तिकीट, नकार दिल्यावर केला चाकूहल्ला

गुंडाराज! तरुणाने मागितलं सलमानच्या सिनेमाचं तिकीट, नकार दिल्यावर केला चाकूहल्ला

अभिनेता सलमान खानच्या सिनेमाचं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर (Man stabbed youth for denying Salman Khan movie ticket) तरुणाने एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

अभिनेता सलमान खानच्या सिनेमाचं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर (Man stabbed youth for denying Salman Khan movie ticket) तरुणाने एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

अभिनेता सलमान खानच्या सिनेमाचं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर (Man stabbed youth for denying Salman Khan movie ticket) तरुणाने एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: अभिनेता सलमान खानच्या सिनेमाचं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर (Man stabbed youth for denying Salman Khan movie ticket) तरुणाने एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर आता (Crime outside movie theatre) थिएटर्स सुरू झाले आहेत. हौशी नागरिक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. सलमान खानच्या ‘अंतिम’ या सिनेमाचं तिकीट काढण्यासाठी (Criminal asked for free ticket) रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला आरोपीनं स्वतःचं तिकीट काढण्याची सूचना केली. मात्र तरुणाने त्याला नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करून गुंड फरार झाला.

अशी घडली घटना

नवी दिल्लीत सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी अजय नावाचा तरुण थिएटरबाहेर तिकीट काढत होता. त्याचवेळी सैय्यद झियाउद्दीन नावाचा गुंड तिथे पोहोचला. आपल्यालाही सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढून दे, अशी तंबी सैय्यदने अजयला दिली. अजयने त्याला स्पष्ट नकार दिला. यावरून चिडलेल्या सैय्यदने स्वतःजवळचा धारदार चाकू बाहेर काढला आणि अजयच्या कंबरेवर वार केला. अजयचं पैशांचं पाकिट त्यानं हिसकावून घेतलं आणि तिथून पळ काढला. आपला पाठलाग केला, तर पोटात चाकूचे वार करण्याची तंबी त्याने दिली.

पोलिसानी केला पाठलाग

थिएटरच्या परिसरात गर्दी असल्यामुळे ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी चोर-चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. या परिसरात पेट्रोलिंगच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलीस शिपायाने आरडाओरडा ऐकला आणि धावणाऱ्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. काही वेळातच पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी अजयचं पाकिट आणि रक्ताळलेला चाकू हस्तगत केला आहे.

हे वाचा- रेल्वे स्टेशन की भूत बंगला? सूर्यास्तानंतर येतात घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज

सैय्यद निघाला सराईत गुंड

सैय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस रेकॉर्डवरून दिसून आलं आहे. लूटमार आणि हल्ल्याच्या 26 केसेस त्याच्याविरोधात दाखल असून त्याने 5 वर्षे तुरुंगाची हवादेखील खाल्ली आहे. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून तो जामीनावर बाहेर आला होता. दिल्ली पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Delhi, Film, Police, Salman khan