मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहणाऱ्या युवकाला चाकूने 6 वेळा भोसकलं; तरुणाच्या वडिलांनी सांगितली संपूर्ण घटना

नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहणाऱ्या युवकाला चाकूने 6 वेळा भोसकलं; तरुणाच्या वडिलांनी सांगितली संपूर्ण घटना

नुपूर शर्माचा व्हिडिओ (Nupur Sharma Video) पाहिल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दरभंगा येथे रेफर करण्यात आलं.

नुपूर शर्माचा व्हिडिओ (Nupur Sharma Video) पाहिल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दरभंगा येथे रेफर करण्यात आलं.

नुपूर शर्माचा व्हिडिओ (Nupur Sharma Video) पाहिल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दरभंगा येथे रेफर करण्यात आलं.

  • Published by:  Kiran Pharate
पाटणा 19 जुलै : राजस्थानमधील उदयपूरसारखंच (Udaipur Tailor Murder) एक प्रकरण आता बिहारच्या सीतामढीमधून समोर आलं आहे. इथे नुपूर शर्माचा व्हिडिओ (Nupur Sharma Video) पाहिल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दरभंगा येथे रेफर करण्यात आलं. त्याला डीएमसीएच हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 आरोपी फरार आहेत. पोलीस याला परस्पर वादाची घटना म्हणत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेला तरुण अंकित झा हा नानपूरमधील बहेरा गावचा रहिवासी आहे. अंकितचे वडील मनोज झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा पान खाण्यासाठी पान दुकानात गेला होता. यादरम्यान तो मोबाईलवर नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर मोहम्मद बिलाल त्याच्या तीन साथीदारांसह तिथे आला. अंकित नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहात असल्याचं पाहून तो संतापला. माकडांनी 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाच्या हातातून हिसकावून तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं, बाळाचा मृत्यू आरोपींनी अंकितच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर उडवत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्याने त्यांनी अंकितच्या कमरेजवळ चाकूने वार केले. अंकितच्या शरीरावर चाकूच्या सहा जखमा आहेत. हीच गोष्ट आपण पोलिसांना सांगितल्याचे मनोज यांनी सांगितलं. अंकितनेही दरभंगा येथे उपचारादरम्यान असंच सांगितलं. मात्र, पोलिसांनी एफआयआरमध्ये नुपूर शर्माचं नाव वगळलं आहे. अंकितच्या वडिलांनी हल्लेखोरांच्या अटकेसोबतच कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नानपूर गावातील गौरा येथील रहिवासी मो बिलाल आणि मोहम्मद निहालसह पाच जणांना आरोपी घोषित केलं आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जखमी तरुण लोकांच्या गर्दीत दिसत आहे. तिथे उभे असलेले लोक तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचं बोलत आहेत. यासोबतच एक तरुण बाईक घेऊन तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, त्याला उपस्थित लोकांनी अडवलं आहे. पुण्यात 32 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सासऱ्याने केली शरीरसुखाची मागणी तर पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध या प्रकरणी पोलिसांनी मात्र वेगळंच कारण सांगितलं आहे.पुपरी डीएसपी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मित्र पान दुकानात पान खात होते, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. पान दुकानातही भांगही विकली जात होती. यादरम्यान चाकूने मारामारी सुरू झाली. या प्रकरणातील नुपूर शर्मा कनेक्शन नाकारताना डीएसपी म्हणाले की, हा दोन मित्रांमधील वाद आहे. जखमी तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या