मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात 32 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सासऱ्याने केली शरीरसुखाची मागणी तर पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध

पुण्यात 32 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सासऱ्याने केली शरीरसुखाची मागणी तर पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध

पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर पती, सासू-सासरे आणि नणंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे, 18 जुलै : राज्यात दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमधये वाढ होत आहे. अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यातच आता पुण्यात सासरा आणि सूनेच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. काय आहे प्रकरण - पैशासाठी आणि इतर कारणासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून सासर्‍यानेच सुनेकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर पती, सासू-सासरे आणि नणंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर ही महिला पती आणि सासू सासऱ्यांसोबत मोहम्मद वाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सोबत राहत होती. यावेळी आरोपी पती आणि इतरांनी पैशासाठी आणि इतर कारणासाठी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तर पतीने तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर 63 वर्षीय सासर्‍याने फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल, असे वागून घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. हा संपूर्ण प्रकार संबंधित महिलेल्या असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच 80 वर्षांच्या सासऱ्याने केला 55 वर्षांच्या सुनेचा विनयभंग - पुण्यात एका पुण्यात 55 वर्षांच्या सुनेचा 80 वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग झाला आहे. यानतंर पोलिसांनी 80 वर्षांच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरू आहेत. फिर्यादी महिलेचे सासर प्रभात रोडला आहे. त्या पतीपासून काही वर्षांपासून वेगळ्या पिंपळे सौदागर येथे राहतात. त्यांच्यात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात ३ केसेस सुरू आहेत. हेही वाचा - स्कूल बस चालकाचा 15 वर्षीय मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना त्यामुळे त्या शुक्रवारी दुपारी सासरी नांदण्यास व राहण्यासाठी जाण्यासाठी आणि पोटगी घेण्यासाठी आल्या होत्या. याचदरम्यान, त्यांच्या 80 वर्षांच्या सासऱ्याने त्यांना अडवले आणि अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी महिलेने डेक्कन पोलीस तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune crime news, Sexual harassment

    पुढील बातम्या