जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! आधी हत्या, मग भाजीसोबत शिजवून खाल्लं शेतकऱ्याचं हृदय अन् जीभ

धक्कादायक! आधी हत्या, मग भाजीसोबत शिजवून खाल्लं शेतकऱ्याचं हृदय अन् जीभ

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

हा व्यक्ती अफगाणिस्तानमध्ये एक सैनिक म्हणूनही कामाला होता. रुग्णालयातून फरार झाल्यानंतर तो फ्रान्सच्या Toulouse येथे पोहोचला.

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस 23 जानेवारी : एक नरभक्षक व्यक्ती (Cannibal) रुग्णालयातून फरार झाला आणि त्याने काठीने एका महिलेला जबर मारहाण केली. तो महिलेला मारहाण करत असताना काही लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी चौकशीत असं समोर आलं की हा व्यक्ती नरभक्षी असून त्याने एका शेतकऱ्याचं हृदय आणि त्याची जीभ भाजीमध्ये शिजवून खाल्ली होती (Cannibal Ate Heart of a Farmer). ही घटना फ्रान्समधील आहे. 60 वर्षीय वृद्ध महिलेला घरातून बाहेर ओढले, दगडाने ठेचून केला खून, बीडमधील घटना न्यूयॉर्क पोस्टमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव जेरेमी रिमबाउड असं आहे. त्याचं वय 34 वर्षे आहे. हा व्यक्ती 2011 सालापासून फ्रान्सच्या एका रुग्णालयात एकप्रकारे बंद आहे. तो मानसिक रुग्ण असल्याने रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. हा व्यक्ती अफगाणिस्तानमध्ये एक सैनिक म्हणूनही कामाला होता. रुग्णालयातून फरार झाल्यानंतर तो फ्रान्सच्या Toulouse येथे पोहोचला. तिथे एक महिला आपल्या पाळीव श्वानाला फिरवत होती. इतक्यात हा व्यक्ती भडकला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. पती आणि सासऱ्याच्या अवैध संबंधाचा केला भांडाफोड; दुसऱ्या दिवशी आढळली मृतावस्थेत कोर्टाने नरभक्षक असलेल्या जेरेमी रिमबाउड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जेरेमीने नोव्हेंबर 2011 मध्ये Nouilhan येथे एका 90 वर्षी शेतकऱ्याची हत्या केली होती. लियोपोल्ड असं या शेतकऱ्याचं नाव होतं. पोलीस तपासात समोर आलं की नरभक्षकाने या शेतकऱ्याचं हृदय आणि जीभ भाजीमध्ये शिजवून खाल्लं होतं. या व्यक्तीला 2011 साली पोलिसांनी तेव्हा अटक केलेली, जेव्हा तो आणखी एका शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. हा व्यक्ती एका लोखंडी रॉडने शेतकऱ्याला मारण्यासाठी घटनास्थळी गेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात